Marathi News> भारत
Advertisement

50 वर्षानंतर 'अमर जवान ज्योती' कायमची विझवणार? केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

Amar Jawan Jyoti : यापुढे तुम्हाला दिल्लीतील इंडिया गेट खाली अमर जवान ज्योती स्मारक दिसणार नाही. कारण या स्मारकाचा पत्ता आता बदलला आहे.

50 वर्षानंतर 'अमर जवान ज्योती' कायमची विझवणार? केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली : ज्यांनी इंडिया गेट पाहिलं असेल त्यांनी अमर जवान ज्योतीची मशालही पाहिली असेल आणि ही मशाल पाहून त्यांनी आपल्या शहीद जवानांना नतमस्तक केलं असेल. पण गुरुवार (20 जानेवारी 2022) ही इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीची शेवटची रात्र होती. अमर जवान ज्योती आज एका विशेष कार्यक्रमात इंडिया गेटपासून फक्त 400 मीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीमध्ये विलीन केली जणार आहे.

50 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमर जवान ज्योती शमणार
 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गेली अनेक दशके तेवत असलेली ही 'ज्योत' आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीत प्रज्वलित होणार आहे. 26 जानेवारीला जोपर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत नाहीत, तोपर्यंत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होत नाही. मात्र यावेळी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

26 जानेवारी 1972 रोजी पासून अमर जवान ज्योती प्रज्वलित
1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली. त्याची सुरुवात 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती.

नवीन पत्ता राष्ट्रीय युद्ध स्मारक
अमर जवान ज्योती सध्या काळ्या रंगाच्या संगमरवरी स्मारकावर ठेवली आहे. त्यावर सोनेरी अक्षरात अमर जवान ज्योती लिहिलेले असेल. याशिवाय, तेथे मशालीसह, एक सेल्फ लोडिंग रायफल देखील उलटी उभी आहे. जी शहीद जवानांबद्दल गर्व प्रकट करते. रायफलच्या वर हेल्मेट देखील आहे, 
पण, आता.. तुम्ही इंडिया गेटवर गेल्यावर तुम्हाला अमर जवान ज्योती दिसणार नाही. आता त्याचे स्थान, त्याचा नवीन पत्ता, राष्ट्रीय युद्ध स्मारक असेल.

Read More