Marathi News> भारत
Advertisement

लग्नानंतर झाली गायब, 7 वर्षांनंतर भेटली तेव्हा पती झाला होता पत्नीच्या मुलाचा भाऊ

एक महिला आपल्या पतीला सोडून पळून गेली. पतीने तिचा खूप शोध घेतला. तब्बल सात वर्षांनी त्याला पत्नी सापडली पण ज्यावेळी तो तिला भेटला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याची पत्नी आई बनली होती आणि तिचा मुलगा नात्याने त्याचा भाऊ लागत होता. 

लग्नानंतर झाली गायब, 7 वर्षांनंतर भेटली तेव्हा पती झाला होता पत्नीच्या मुलाचा भाऊ

उत्तर प्रदेशमधल्या बदायूमध्ये (Budaun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला आपल्या पतीला सोडून गायब झाली. त्याच दिवसापासून त्याचे वडीलही गायब झाले. त्या व्यक्तीने पत्नीचा बराच शोध घेतला. पोलिसातही तक्रार दाखल केली. पण तिचा कुठेच शोध लागला नाही. अखेर तब्बल सात वर्षांनी त्या व्यक्तीला पत्नीचा शोध लागला. पण ज्यावेळी ती भेटी त्यावेळी ती आई बनली होती आणि तिचा मुलगा हा तिच्या पतीचा नात्याने भाऊ बनला होता. त्याच्या पत्नीने पतीच्या वडीलांबरोबर म्हणजे सासऱ्याबरोबर (Father in Law) पळून जाऊन लग्न केलं होतं. पतीने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी केली कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि दोघांना पोलीस स्थानकात आणण्यात आलं. महिला आणि तिचा सासरा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मुलगा अडसर ठरत असल्याने त्याच्या वडिलांनी सूनेला घेऊन घरातून पळ काढला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगाही झाला. पोलिसांनी असं करण्यामागचं कारण विचारल्यावर आपल्या पतीला कंटाळली असल्याचं तीने सांगितलं. स्वत:च्या मर्जीने सासऱ्याबरोबर पळून गेली आणि लग्न केल्याची कबुलीही तीने दिली. 

इतकंच नाही तर लग्नावेळी पती अल्पवयीन होता, त्यामुळे हे लग्न आपल्याला मान्य नसल्याचंही तीने सांगितलं. महिलेने सासऱ्याबरोबर लग्न झाल्याची कागदपत्रही पोलिसांना सादर केली. सासरा आणि सुनेने स्वमर्जीने केलेलं लग्न आणि दोघंही समझदार असल्याने पोलिसांना दोघांना सोडून द्यावं लागलं. हा विषय आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

2016 मध्ये झालं होतं लग्न
हे प्रकरण उत्तर प्रदेशमधल्या बदायू जिल्ह्यातलं आहे. जिल्ह्यातील बिसौली गावात राहाणाऱ्या तरुणाचं 2016 मध्ये वजीरगंजमध्ये राहाणाऱ्या तरुणीशी लग्न झालं. तब्बल एक वर्ष दोघं एकत्र राहिले. पण एका वर्षानंतर एकेदिवशी अचानक वडिल आणि पत्नी गायब झाले. तेव्हापासून तो दोघांचा शोध घेत होता. तब्बल सात वर्षांनंतर वडिल आणि पत्नी चंदौसी गावात सापडले. पण दोघांनीही लग्न केलं होतं.

लग्नावेळी पती अल्पवयीन होता, शिवाय तो जास्त शिकलेलाही नव्हता. इतकंच काय तर घर चालवण्यासाठी तो कोणताही नोकरी-धंदा करत नव्हता त्यामुळे ती पतीला कंटाळली होती. अनेकवेळा सांगूनही पती काही कमवत नव्हता. यादरम्यान तिचे आणि सासऱ्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघआंनी कोर्ट मॅरेज केलं. आता त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. गावात बदनामी होईल या भीतीने त्यांनी गावातून पळ काढला असं महिलेने सांगितलं.

Read More