Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआयने दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात  चिदंबरम यांचे नाव समाविष्ट कले आहे. 

एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत. २००६ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला अटक झाली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. सप्टेंबर २०१७ मध्ये ईडीने कार्ती याची १.१६ कोटींची संपत्तीही जप्त केली होती. 

दरम्यान, चिदंबरम यांच्यासह अन्य १७ जणांची नावे आरोपपत्रात आहेत. त्यात सध्या सेवेत असलेल्या आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  चिदंबरम यांनी अर्थमंत्री पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आधीच ईडीने चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे. दिल्लीतील एका न्यालयाने चिदंबरम यांना अटक करण्यास १० जुलैपर्यंत मनाई आदेश दिला होता. त्याचवेळी गरज पडेल तेव्हा त्यांनी चौकशीस हजर राहावे, असेही निर्देश देण्यात आले होते.

Read More