Marathi News> भारत
Advertisement

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे. 

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अजून ताज्य असताना संगीता, अंजूनंतर एका महिलेची लव्ह स्टोरी (Love Story) सोशल मीडियावर (Viral Story) व्हायरल होते आहे. (Trending Story) प्रेमासाठी वर्षभराच्या मुलाला घेऊन ही महिला नोएडामध्ये पोहोचली आहे. (Trending News Today) मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव सोनिया अख्तर असून ती बांगलादेशहून आली आहे. (after seema haider Sania Akhtar Came To Noida From Bangladesh Viral Love Story Trending News Today)

ट्रेंडिंग लव्ह स्टोरी!

नोएडामधील सौरभ तिवारीने बांगलादेशमध्ये तिच्याशी लग्न केल्याचा दावा या महिलेने केला आहे. सौरभ कांत तिवारी जेव्हा नोकरीसाठी बांगलादेशमध्ये आला होता तेव्हा त्यांचं प्रेम झालं. त्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. 

प्रेम प्रकरणाला वेगळं वळण!

सानियाने असा दावा केला आहे की, लग्नानंतर ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर सौरभने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. भारतात काही महत्त्वाचं काम संपवून परत येतो असं सांगून तो गेला पण अनेक महिने झाले तरी तो परत आला नाही. सौरभला फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांने सर्व नंबर बंद केले होते. 

सीमा हैदरला पाहून आपल्या हिमत आली आणि आपण भारत गाठल्याचं सानियाने पोलिसांनी सांगितलं. ती व्हिसा घेऊन भारतात आली खरी पण सौरभच्या घरात गेल्यावर तिच्यावर आभाळ कोसळलं. सौरभच्या घरी गेल्यावर तिला कळलं की त्याने दुसरं लग्न केलं आहे. तर आता तो तिला स्विकारण्यास नकार देत असल्याचा तिने आरोप केला आहे. 

त्यामुळे सानिया मुलासह सेक्टर 108 मधील पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचली आणि तिने त्यांना मदतीची याचना केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार सौरभ बंगालादेशमधील ढाकामध्ये कल्टी मॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता. सानिया आणि तिच्या मुलाला पोलिसांनी सेक्टर-62 मधील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं आहे. दरम्यान नोएडा पोलीस आयुक्तालयाच्या महिला कक्षाने सौरभ आणि तिच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

सानियाचं म्हणं आहे की, सौरभने एक तर तिला भारतात तिच्या घरी ठेवावं नाही तर त्याने बांगलादेशला परत यावं. सीमा हैदरनंतर आता सानियाचे प्रकरण समोर आल्याने नोएडा पोलिसांचं नाकीनऊ आले आहे. 

यापूर्वी पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या चार मुलांसह तिचा प्रियकर सचिन मीणा याच्याकडे कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात आली आहे. सीमा आणि सचिनची मैत्री PUBG गेमच्या खेळताना झाली. सचिनने तिच्याशी लग्न केल्याचा दावाही सीमाने केला आहे.

Read More