Marathi News> भारत
Advertisement

बोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता CNG-PNG ही महागणार

वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

बोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता  CNG-PNG ही महागणार

मुंबई : वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि दिल्ली या महत्त्वाच्या शहरामध्ये सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (Piped Natural gas) दरात येत्या ऑक्टोबरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढ एकूण10 ते 11 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय सिक्योरिटीजच्या एका रिपोर्टमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपोर्टनुसार,  सरकारद्वारे गॅसच्या दर जवळपास 76 टक्क्यांनी वाढणार आहेत. ज्याचा परिणाम हा सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीवर होईल.  (After LPG cylinders CNG PNG prices are likely to increase by 10 per cent in October 2021) 

सरकार गॅस अधिशेष देशांचे दर वापरते. ओएनजीसी (ongc) नामांकनाच्या आधारावर कंपन्यांना संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलं गेलंय. त्यानुसार नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतला जातो. या किंमतीचा पुढील आढावा हा आता 1 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

ब्रोकरेज कंपनीनुसार, 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत APM किंवा प्रशासित दर $ 3.15 प्रति युनिट (MMTTU) पर्यंत वाढेल. सध्या हे दर प्रति युनिट $ 1.79 इतके आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी पीएलसीच्या केजी-डी 6 क्षेत्रापासून गॅस दर $ 7.4 प्रति एमएमबीटीयू इतकी होईल. 

नैसर्गिक वायू हा कच्च्या स्वरुपात असतो. याचा प्राथमिक स्वरुपात वापर करता येत नाही. या नैसर्गिक वायूचा उपयोग हा इंधन आणि घरगुती वापरासाठी केला जातो. या वायूचा इंधन वापर करण्यासाठी याचं रुपांतर हे सीएनजीमध्ये केलं जातं. तर घरगुती वापरासाठी याला पीएनजीमध्ये बदललं जातं. 

अहवालानुसार, शहरातील गॅस वितरण कंपन्यांना यामध्ये दरवाढ करणं हे आव्हानात्मक असेल. याचा अर्थ त्यांच्यासाठी सीएनजी आणि पीएनजी नैसर्गिक वायूची किंमत वाढेल. एपीएम गॅसच्या किमती वाढल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीचे वितरण करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लि. (IGL) ला पुढील एक वर्षात किंमतीत मोठी वाढ करावी लागेल. मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील. 10 ते 11 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार, एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान एपीएम गॅसची किंमत वाढून $ 5.93 प्रति युनिट होईल. ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत हेच दर प्रति युनिट 7.65 डॉलर इतकी होईल.   

याचाच अर्थ असा की एप्रिल 2022 मध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये 22-23 टक्क्यांनी वाढ होईल. तसेच ऑक्टोबर 2022 मध्ये या दरांमध्ये 11 ते 12 टक्क्यांनी वाढ होईल. रिपोर्टनुसार  एपीएम गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर, 2021 ते ऑक्टोबर, 2022 दरम्यान एमजीएल आणि आयजीएलला किंमती 49 ते 53 टक्क्यांनी वाढवाव्या लागतील.

Read More