Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक, गोव्यानंतर आता पश्चिम बंगालही भाजपचे लक्ष्य

दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत. 

कर्नाटक, गोव्यानंतर आता पश्चिम बंगालही भाजपचे लक्ष्य

कोलकाता : कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत. तृणमूल, सीपीएम आणि काँग्रेसचे मिळून १०७ आमदार लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी केला. असे झाल्यास विरोधकांच्या गोटातील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल. तसेच ममतांच्या तृणमूल सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

भाजपने यापूर्वीही तृणमूलचे आमदार आपल्या पक्षात येणार असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलचे ४० पेक्षा अधिक आमदार संपर्कात असल्याचे म्हटले होते. बंगाल भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूलचे आमदार भाजपमध्ये सामील होणे सुरूच राहील, असे सांगितले होते. विद्यमान विधानसभेत तृणमूल- 211, कॉँग्रेस- 44, माकपा- 26, भाजप- 03 तर अन्य 10 असे पक्षीय बलाबल आहे. सीपीएम, काँग्रेस व तृणमूलचे मिळून १०७ आमदार आपल्या संपर्कात असून त्यांची यादी तयार आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे भाजप नेते मुकुल रॉय यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलचे ५ आमदार आणि १०० नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. आता आणखी आमदार त्याच मार्गावर गेल्यास तृणमूलला खिंडार पडणार आहे. 

सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, पक्षात सुरू असलेलेल राजीनामा सत्र असे अनेक प्रकार घडत असतानाच आणखी एक संकट आता काँग्रेसवर आले आहे.  काँग्रेसला आता आर्थिक चणचण भासू लागलीय. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसवर आपल्या खर्चात कपात करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडिया टीमचे २० जण पगार थकल्याने सोडून गेलेत. तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही उशीराने वेतन मिळतंय. त्याचबरोबर काँग्रेस सेवादलाला महिन्याला अडीच लाख रूपयांचा निधी देण्यात येत होता. आता त्यात कपात करून 2 लाख रूपये करण्यात आले आहे.

Read More