Marathi News> भारत
Advertisement

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Uzbekistan Cough Syrup Death : काही दिवसांपूर्वी गांबियामध्ये भारतातील औषधनिर्मिती कंपनीने तयार केलेल कप सिरप प्यायल्यामुळे 66 मुलांचा मृत्यू (Uzbekistan Children Death)  झाल्याची घटना ताजी असतानाच आता झबेकिस्तानमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. भारतीय औषधनिर्मिती कंपनीचे कप सिरप (Indian manufactured Cough syrup) प्यायल्यारामुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानने केला आहे. त्यामुळे आता कफ सिरप प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी भारताकडे बोट दाखवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशात सिरपचे उत्पादन

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे उत्पादित होणाऱ्या भारतीय कंपनीच्या औषधामुळे उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उझबेकिस्तानने केलेल्या आरोपानंतर भारत सरकारनेही चौकशी सुरू केली आहे. या मुलांना डॉक -1 मॅक्स गोळ्या आणि मॅरियन बायोटेकने निर्मित सिरप देण्यात आल्याची माहिती स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसने दिली आहे. याप्रकरणाचा तपास करण्याच्या सूचनाही स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसने दिल्या आहेत.

उझबेकिस्तानमधील मुलांच्या मृत्यूनंतर क्यूरमॅक्स मेडिकल (Quramax Medical) अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅब चाचणीदरम्यान या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल हे केमिकल आढळून आले आहे. हे केमिकल दूषित असल्याचीही माहिती समोर आली आहे. याच केमिकलमुळे गांबियात 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी हरियाणाच्या मेडेन फार्माची चौकशी करण्यात आली होती. मात्र भारत सरकारने कंपनीकडून घेतलेले सर्व नमुने तपासणीत बरोबर आढळले आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले कफ सिरप

हे सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्यात आल्याची माहितीही समोर आले आहे. त्यात पॅरासिटामॉल जास्त प्रमाणात असून मुलांच्या पालकांनी त्याचा चुकीचा वापर केल्याचेही म्हटले जात आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे उलट्या, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मेड इन इंडियावरुन कॉंग्रेसची टीका

आता भारतातील विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी मेड इन इंडिया कफ सिरफ जीवघेणे असल्याचे म्हटले आहे. मेड इन इंडिया कफ सिरप प्राणघातक वाटत आहे. यापूर्वी गांबियामध्ये 70 मुलांचा मृत्यू झाला होता आणि आता उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने भारताबद्दल बढाई मारणे बंद करून कठोर कारवाई करावी, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.

Read More