Marathi News> भारत
Advertisement

Aditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?

Aditya-L1 Mission Challenges For ISRO: सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन सूर्याच्या दिशेने रवाना झालं.

Aditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?

Aditya-L1 Mission Challenges For ISRO:  आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच 'इस्रो'च्या लॉन्च पॅडवरुन आदित्य-L1 ही विशेष ऑर्बिटर मोहीम सूर्याच्या दिशेनं झेपावली. हे यान 15 लाख किलो मीटरचा प्रवास करुन सूर्याच्या कक्षेत पोहचणार आहे. पुढील 4 महिने आदित्य-L1 यान अंतराळात सूर्याच्या दिशेने प्रवास करणार आहे. 4 महिन्यांनी हे याने सूर्याजवळच्या आपल्या निर्धारित लँग्रेज पॉइण्ट-1 वर पोहोचणार आहे. या ठिकाणी हे यान सूर्याच्या कक्षेत स्थीर होऊन त्याच्याभोवती फेऱ्या मारत महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे. मात्र या 4 महिन्यांच्या प्रवासादरम्यान हे आदित्य-L1 यान करणार तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 'इस्रो'ला काही आव्हानांचा समाना करावा लागेल. नेमकी ही आव्हानं काय आहेत आणि आदित्य-L1 या चार महिन्यात काय करणार जाणून घेऊयात...

16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत

पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन रवाना झालं. आज इस्रोने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सेप्रेट झालेल्या यानाच्या मदतीने पृथ्वीच्या खालच्या स्तरातील कक्षेत सूर्यावर जाणारं हे यान स्थीर केलं. यानंतर पुढील 16 दिवस भारताचं हे 'आदित्य' यान पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. चांद्रयान-3 मिशनप्रमाणेच एकामागेमाग एक ऑन बोर्ड प्रोपल्शनच्या प्रयोगामधून हळूहळू हे याने पृथ्वीच्या अन्य कक्षांमध्ये टप्प्याटप्प्यात पाठवलं जाईल. 5 टप्प्यातील प्रोपल्शननंतर हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर पाठवलं जाईल.

4 महिन्यांचा कालावधी

'इस्रो'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर आदित्य एल-1 मोहिमेतील क्रूज फेज सुरु होईल. आदित्य एल-1 चा एकूण प्रवास हा 125 दिवसांचा असणार आहे. 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिल्यानंतर सूर्याच्या दिशेने जाणारं हे यान हळूहळू पॉइंट-1 कडे वाटचाल सुरु करेल. 109 दिवसांमध्ये हे यान अत्यंत वेगाने सूर्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर कर्व्ह आणि यूटर्नच्या मदतीने हे यान सूर्याच्या एक-1 पॉइंटमधील हॉलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केलं जोईल. या पॉइण्टपर्यंत पोहोचण्यासाठी या यानाचा 4 महिन्यांचा कालावधी लागेल. जानेवारीच्या मध्यापर्यंत भारताचं हे यान आपला प्रवास संपवणार आहे. मात्र संशोधनाचं खरं काम 'इस्रो'ला फेब्रुवारीच्या अंताकडेच सुरु करता येईल. 

नक्की वाचा >> आधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?

7 पेलोड घेऊन जाणार

पृथ्वीपासून सूर्य 152 मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. आदित्य एल-1 पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एकूण अंतराच्या केवळ 1 टक्के प्रवास करुन आदित्य एल-1 यान संशोधनाला सुरुवात करणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या बाहेरील बाजूला निरीक्षण करण्याबरोबरच 7 पेलोड घेऊन जाणार आहे. यापैकी 4 पेलोड सूर्याचा अभ्यास करतील आणि डेटा पाठवतील. तर 3 पेलोड हे एल-1 पॉइंटजवळ संशोधन करतील. जी उपकरणं किंवा सुटे भाग अंतराळयानाबरोबर पाठवली जातात त्याला तांत्रिक भाषेत पेलोड असं म्हणतात.

Read More