Marathi News> भारत
Advertisement

आता अदानी गृप मुंबई विमानतळाचे कारभारी; 2024 मध्ये नवी मुंबई विमानतळही तयार करणार

अदानी इंटरप्राइजेजची सब्सिडिअरी कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मंगळवारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मॅनेजमेंट आपल्या हातात घेत

आता अदानी गृप मुंबई विमानतळाचे कारभारी; 2024 मध्ये नवी मुंबई विमानतळही तयार करणार

मुंबई : अदानी इंटरप्राइजेजची सब्सिडिअरी कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मंगळवारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मॅनेजमेंट आपल्या हातात घेतले. मुंबई एअरपोर्टचे प्रबंधन आतापर्यंत GVK गृप सांभाळत होता.

कंपनीच्या एका प्रेस रिलिजमध्ये सांगण्यात आले की, भारत 2024 पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा विमानन बाजार असेल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच अदानी गृपकडे आणखी 6 विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी आहे. मुंबई एअरपोर्ट भारतातील दुसरे सर्वाधिक व्यस्त एअरपोर्ट आहे. 

2024 पर्यंत तयार होईल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्माण AAHL पुढील महिन्यापासून सुरू करणार आहे. 90 दिवसांमध्ये financial closure पूर्ण करणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये सुरू होईल. अशी माहिती कंपनीने दिली आहे.

अदान गृपकडे या विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी
मुंबई, गुवाहाटी, लखनऊ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर आणि तिरूवंतपूरम या विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी अदानी समुहाकडे आहे.

Read More