Marathi News> भारत
Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्रीला भर रस्त्यात अडवत गोळ्या घालून संपवलं, घटनेने सर्वत्र खळबळ!

प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता एका अभिनेत्रीला भररस्त्यात गोळ्या मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीला भर रस्त्यात अडवत गोळ्या घालून संपवलं, घटनेने सर्वत्र खळबळ!

 Actress Riya Shot Dead : प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता एका अभिनेत्रीला भररस्त्यात गोळ्या मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडची (Jharkhand) अभिनेत्री रिया कुमारीवर तिच्या पती आणि मुलीसमोरच गोळ्या मारून ठार मारण्यात आलंय. रिया कुमारी झारखंडमधील टीव्ही इंडस्ट्रीतील (TV Industry) मोठा आणि प्रसिद्ध चेहरा होती. वयाच्या 22 व्या वर्षी तिला आपला जीव गमवावा लागला आहे. (actress riya kumari shot dead on highway during robbery latest entertainment marathi crime news)

नेमकं काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालच्या (West Bengal) महामार्गावरील हावडा (Howrah) येथे ही घटना घडली. अभिनेत्रीचा पती प्रकाश कुमार (Prakash Kumar) त्यांच्या 2 वर्षाच्या मुलीसह कोलकाताकडे निघाले होते. बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास बागनान जवळील महेश खेडा पुलाजवळ हल्लेखोरांनी रिया कुमारी यांची गाडी अडवली. त्यावेळी हल्लेखोर आणि तिच्यामध्ये झटापट झाली, त्यादरम्यान हल्लेखोरांनी तिच्यावर गोळ्या झाडण्यात (Firing) आल्या.

घटनेनंतर आजूबाजूला कोणीही न दिसल्याने तिच्या पतीने गाडी चालवत राजापूर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. घडलेल्या घटनेच्या परिसराच्या आवारातील सीसीटीव्ही पोलीस तपासत आहेत. 
 
दरम्यान, प्रकाश कुमार तीन किलोमीटर परिसरात मदतीसाठी फिरत होते. रियाला लगोलग उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. दुसरीकडे पोलिसांनी रियाच्या पतीने दिलेल्या माहितीवरून त्याच्याकडे संशयास्पद पाहत आहेत. पोलिसांनी रियाच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

Read More