Marathi News> भारत
Advertisement

निषेध : राहुल गांधींच्या उपस्थित इंडिया गेटवर कँडल मार्च

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च  

निषेध : राहुल गांधींच्या उपस्थित  इंडिया गेटवर कँडल मार्च

नवी दिल्ली : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या घटनांमुळे व्यथित झाल्याचं सांगत महिलांबाबत अशी वागणूक खपवून घेतली जाणार नाही असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितले.राहुल गांधी यांनी कठुआ आणि उन्नाव येथे घडलेल्या घटनांबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले होते. तशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या दोन्ही घटनांच्या निषेध करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळण्यासाठी इंडिया गेटवर शांततापूर्ण कँडल मार्च काढण्यात येईल अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली होती. 

fallbacks

या मोर्च्यात अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनीसारखे काँग्रेसचे दिग्गद नेतेही सहभागी झाले होते. तसेच प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. निर्भयाचे आई-वडीलही या मोर्च्यात सहभागी झाले होते.  

fallbacks

 

 

fallbacks

Read More