Marathi News> भारत
Advertisement

पुरुषात दडलेली आई ठरली 'जगात भारी'

हा मुलगा म्हणजे उर्जेचा आणि सकारात्मकडेचा अखंड स्त्रोत 

पुरुषात दडलेली आई ठरली 'जगात भारी'

पुणे : मातृत्त्व म्हणजे एक प्रकारची निसर्गाची किमया आणि स्त्रीला मिळालेलं वरदान. 'आई'... या आईमध्ये किंवा आईभोवतीच साऱ्यांचं विश्व असतं. अर्थात या आईचं विश्वसुद्धा तिच्या कुटुंब आणि मुलाबाळांभोवतीच फिरत असतं. अशाच एका आईचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आई म्हणून गौरवण्यात आलेल्या या Worlds Best Mommyचं नाव आहे, आदित्य तिवारी. 

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आदित्यचा गौरव करण्यात आला. आता तुम्ही म्हणाल 'आदित्य' आणि 'आई' यामध्ये काहीतरी गोंधळ उडालाय का? तर, तसं नाही आहे. कारण, आदित्य तिवारी या तरुणालाच Worlds Best Mommyच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. ज्यानं २०१६मध्ये एका Down Syndrome असणाऱ्या मुलाला दत्तक घेतलं होतं. 

पाच महिन्यांच्या असतानाच आदित्य अवनिशला भेटला होता. ज्यानंतर त्याने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेतला. अवनिशला आदित्यने दत्तक घेतलं. ज्यानंतर त्याने गडेगंज पगाराची नोकरी सोडली आणि अवनिशच्या संगोपनाला प्राधान्य दिलं. त्याच्या या अनोख्या मातृत्त्वाची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली. अवनिशमुळेच मला माझी ओळख मिळाली असं आदित्य अभिमानाने सांगतो. 

नोकरी सोडल्यानंतर आदित्यनं समुपदेशन, मार्गदर्शन आणि पालकांना मुलांच्या संगोपनासाठी प्रोत्साहित करत त्यांना मदत करण्याचं काम करण्याचा निर्णय घेतला. ज्या निमित्ताने तो अवनिशसह विविध राज्यांमध्येही जातो. Down Syndromeग्रस्त मुलांच्या पालकांसाठी आदित्य म्हणजे एक आदर्श आणि मार्गदर्शकही ठरत आहे. 

...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

अवनिश म्हणजे आयुष्यात आलेला उर्जेचा आणि सकारात्मकतेचा एक अखंड स्त्रोत असं समजणाऱ्या आदित्य तिवारीने शक्य त्या सर्व परिंनी अवनिशच्या जीवनात खऱ्या अर्थाने रंग भरले आहेत. तोच अवनिशची आई आणि बाबाही आहे. जिथे अनेक पालक मुलांमध्ये असणारं व्यंग कित्येकदा लपवू पाहतात, अनेकदा त्यांना अनाथ आश्रमांच्या वाटेवर एकटंही सोडतात अशा या विश्वात आदित्यसारख्या व्यक्ती म्हणजे एक देवदूतच. त्यामुळे या पुरुषात दडलेल्या आईचा झालेला गौरव खऱ्या अर्थाने मातृत्त्वाचं महत्त्वं आणखी वाढवून गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

 

Read More