Marathi News> भारत
Advertisement

देशातील एक रहस्यमयी मंदिर; दर 20 वर्षांनी होतो इथे 'हा' मोठा चमत्कार

आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा संबंध कलियुगाच्या समाप्तीशी असल्याचं मानलं जातं.

देशातील एक रहस्यमयी मंदिर; दर 20 वर्षांनी होतो इथे 'हा' मोठा चमत्कार

आंध्र प्रदेश : निसर्गातच असंख्य रहस्यं आहेत, त्यापैकी काही रहस्यं फक्त मानवालाच कळली आहेत. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ आजपर्यंत या रहस्यांचा उलगडा करू शकलेलं नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा संबंध कलियुगाच्या समाप्तीशी असल्याचं मानलं जातं. हे रहस्य मंदिराशी संबंधित आहे. 

या मंदिरामध्ये नंदी महाराजांची मूर्ती विराजमान आहे. वास्तविक, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात यागंती उमा महेश्वर नावाचं मंदिर आहे. हे मंदिर जितके अप्रतिम आहे तितकंच रहस्यही त्यात आहे. या मंदिरात असलेली नंदी महाराजांची मूर्ती रहस्यमय मार्गाने सतत विशाल होत असल्याचा दावा केला जातो.

या मंदिरात असलेल्या नंदी महाराजांच्या मूर्तीबद्दल असा दावा केला जातो की, एक दिवस असा येईल जेव्हा नंदी महाराज जिवंत असतील, ते जिवंत होताच या जगात मोठा महापूर येईल आणि या कलियुगाचा अंत होईल. 

काय आहे या मंदिराचा इतिहास

हे मंदिर 15 व्या शतकात बांधलं गेल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर संगमा वंशाचा राजा हरिहर बुक्का यांनी बांधलं होतं. असं म्हणतात की, अगस्त्य ऋषींना या ठिकाणी व्यंकटेश्वराचं मंदिर बांधायचं होतं, परंतु मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीच्या पायाचं नखं तुटलं.

या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी अगस्त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान शिवाच्या आशीर्वादाने अगस्त्य ऋषींनी उमा महेश्वर आणि नंदीची स्थापना केली.

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Read More