Marathi News> भारत
Advertisement

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.   

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने पाचवीत शिकणाऱ्या मुलीने प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मुलगा दुसऱ्या समाजातील असल्याने हा वाद पेटला आहे. मुलीचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी मुलाच्या घरी पोहोचले असता त्यांना धमकावण्यात आलं. पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. 

तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी काही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मेरठमध्ये रस्ता अडवला आणि पोलिसांविरोधात घोषणा लगावल्या. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

भावनपूर येथील अब्दुल्लापूर परिसरात ही घटना घडली आहे. मुलगी पाचवीत शिकणारी आहे. आरोप आहे की, याच ठिकाणी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने मुलीला चॉकलेट आणि प्रेमपत्र दिलं. आरोपी मुलगा मुलीला आमिष दाखवत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता असा आरोप आहे. मुलीने नकार दिल्यानंतर त्याने धमकी दिल्याचंही सांगण्यात आलं आहे. यानंतर मुलीने कुटुंबाला सगळा घटनाक्रम सांगितला. 

मुलीने तक्रार केल्यानंतर कुटुंबीय जाब विचारण्यासाठी मुलाच्या घरी पोहोचले होते. पण त्यांनी काही ऐकून घेतलं नाही. पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर कुटुंबायींना ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता अडवला. मुलगा आणि मुलगी वेगळ्या समाजातील असल्याने वाद वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

एसएसपी रोहित सिंग यांनी याप्रकरणी सांगितलं आहे की, "भावनापूरच्या अब्दुल्लापूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार केली आहे की, 11 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीला शाळेत येता जाता प्रेमपत्र देतो. तसंच तिची छेड काढत असे. आम्ही गुन्हा दाखल केला असून, मुलाची चौकशी करत आहोत".

Read More