Marathi News> भारत
Advertisement

MIG-21 Plane Crash : मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

Rajasthan MIG Plane Crash : राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे.

MIG-21 Plane Crash : मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

जयपूर :  राजस्थानच्या बाडमेरमध्ये वायूदलाचं मिग-21 हे फायटर लढाऊ विमान कोसळलं आहे. हे फायटर विमान जमिनीवर आदळल्यानंतर आग लागल्याचं समजतंय. पोलिस आणि प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना इतकी भीषण होती की विमानाचा अवशेष सुमारे 1 किमीच्या भागात विखुरले गेले. मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात विमानातील  दोन्ही पायलट शहीद झाले आहेत. विमानातील दोन वैमानिकांचे पॅराशूट उघडलेले नव्हते. मात्र, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि वायू दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. (a mig 21 fighter aircraft of indian air Force crashed near barmer district)

भीमडा गावात हा अपघात झाला. बाडमेरमध्ये मिग-21 लढाऊ विमान कोसळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी वायूदलाच्या प्रमुखांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली.

मिग 21 क्रॅश झाल्याच्या बातमीने गावात भितीच वातावरण तयार झालं.  ही घटना रात्री नऊच्या सुमारास सांगितली जात आहे. अपघातादरम्यान विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटरपर्यंत पसरला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, संपूर्ण परिसरात जोरदार स्फोट होऊन आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून नागरिकांमध्ये भिती पसरली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घएतली.  सुदैवाने अपघात होण्यापूर्वीच विमान लोकवस्तीपासून दूरवर पोहोचलं होते. दरम्यान सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Read More