Marathi News> भारत
Advertisement

रोड शोमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली रोडशोदरम्यान एकाने लगावली. 

रोड शोमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली रोडशोदरम्यान एकाने लगावली. त्यामुळे यावेळी मोठा गोंधळ झाला. दिल्लीच्या रोड शोमध्ये केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. हा रोड शो दिल्लीच्या मोतीनगर भागात सुरू होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. 

fallbacks

पोलिसांनी तातडीने या माथेफिरूला ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अरविंद केजरीवाल प्रचार करत होते. ते जीपवर उभे होते. त्याचवेळी एका माणसाने जीपवर चढत त्यांच्या थोबाडीत लगावली.

fallbacks

दरम्यान विरोधी पक्षांकडूनच हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला आहे.

Read More