Marathi News> भारत
Advertisement

माझ्या बायकोला मच्छर चावतात, पठ्ठ्याने थेट पोलिसांकडे केली तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलं असं काही...

Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका व्यक्तीने रुग्णालयात पत्नीला मच्छर (Mosquitoes) चावत असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनीही त्यावर असं काही केलं ही, तुम्हीही भावूक व्हाल. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.   

माझ्या बायकोला मच्छर चावतात, पठ्ठ्याने थेट पोलिसांकडे केली तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलं असं काही...

Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका व्यक्तीने रुग्णालयात पत्नीला मच्छर (Mosquitoes) चावत असल्याने थेट पोलिसांकडे तक्रार केली. पत्नी गर्भवती असल्याने त्याने थेट पोलिसांकडेच मदत मागत आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे पोलिसांनीही त्याच्या तक्रारीची दखल घेतली अन् मदतीला पोहोचले. उत्तर प्रदेश पोलिसांनीच ट्वीट करत याची माहिती दिली आहे. 

असद खान असं या व्यक्तीचं नाव आहे. गर्भवती असल्याने त्याच्या पत्नीला चंदौसी येथील हरी प्रकाश नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण यावेळी रुग्णालयात तिला मच्छरांचा फार त्रास होत होता. यानंतर असद खान याने थेट पोलिसांकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला.

पत्नीला होणारा त्रास असद खान यांनी पहावला नाही. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करत ट्वीट केलं. "माझ्या मुलीने हरी प्रकाश नर्सिंग होममध्ये एका मुलीला जन्म दिला आहे. माझ्या पत्नीला आधीच वेदना होत असताना मच्छरांची संख्या खूप असून ते चावत आहेत. कृपया मला तात्काळ मॉर्टेन कॉइल पुरवा," असं त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं. 

या ट्वीटनंतर पोलीस मुख्यालयातून पोलिसांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार पोलीस कॉइल घेऊन तात्काळ रुग्णालयात पोहोचले. यानंतर असद यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 

"प्रसूतीवेदना होत असल्याने माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला आधीच असह्य वेदना होत असताना मच्छरही त्रास देत होते. मध्यरात्रीचे 2 वाजले असल्याने मदतीसाठी मला पोलीस वगळता इतर कोणी आठवलं नाही. मी ट्वीट केल्यानंतर काही वेळातच मला प्रतिसाद मिळाला. यानंतर पुढील 10 ते 15 मिनिटांत त्यांनी मला कॉइल पुरवलं. मी उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार मानतो," अशी भावना असद खान यांनी व्यक्त केली आहे. 

Read More