Marathi News> भारत
Advertisement

....विमानातून जेव्हा आवाज आला 'मुझसे शादी करोगी?'

सोशल मीडियातून या हटक्या प्रपोजचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. 

 ....विमानातून जेव्हा आवाज आला 'मुझसे शादी करोगी?'

नवी दिल्ली : इंदोरहून गोव्याला जाणाऱ्या एका विमानात प्रवाशांना चक्क फिल्मी प्रपोज पहायला मिळाला. विमान प्रवासात असतानाच एका प्रियकराने प्रवासात असलेल्या एका प्रेयसीला विमानातील इंटरकॉम सेवेचा वापर करत प्रपोज केला. सोशल मीडियातून या हटक्या प्रपोजचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. घटना इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात घडली.

देवी आहिल्याबाई होळकर विमानतळाचे निर्देशक अर्यमा सन्याल यांनी सांगितले की, मॅरेज प्रपोजलचा हा सीन इंडिगो एअरलाईन्सच्या इंदोर-गोवा विमानामध्ये २० मे या दिवशी घडला. दरम्यान, त्यांनी विमान क्रमांक आणि त्याच्या इंदोरहून उड्डाण करण्याची वेळ सांगण्यास मात्र नकार दिला. त्यांनी सांगितले की, युवकाने या आधी एअरोब्रिज (विमानतळावर सुरक्षेबाबत तपासणी झाल्यावर प्रवाशांना थेट विमानात घेऊन जाणारा पूल) वर आपला प्रस्ताव ठेवला आणि त्याने मॅरेज प्रपोज करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता.

दरम्यान, या प्रस्तावाला अनुमती मिळताच एअरलाईन्सच्य क्रू मेंबर्सनी त्याला सहकार्य केले. त्याला विमानातील इंटरकॉम वापरण्याची संधी उपलब्ध करून दिली. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओत आपले नाव घेतले जाताच आपल्या सीटवरून उठून प्रियकराजवळ येते आणि तो प्रियकर गुडघ्यावर बसून तिला गुलाबाचे फुल देत 'विल यू मॅरी विथ मी'?, असे विचारताना दिसतो. साधारण १ मिनिट १६ सेकंदांचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूट केला गेला आहे.

Read More