Marathi News> भारत
Advertisement

तरुणाच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका; पोलिसांना फोन, उघडून पाहिल्यानंतर सगळेच चक्रावले

Crime News: विनोद जेव्हा हॉटेलमधून घरी जाऊ लागला तेव्हा त्याच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी पोहोचून बॅग उघडली असता सगळ्यांनाच धक्का बसला.   

तरुणाच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका; पोलिसांना फोन, उघडून पाहिल्यानंतर सगळेच चक्रावले

Crime News: हिमाचलमधील मनालीमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीची तिच्याच मित्राने हॉटेलमध्ये हत्या केली. हत्या केल्यानंतर मैत्रिणीचा मृतदेह बॅगेत भरुन तो निघाला होता. पण त्याच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली आणि हत्येचा उलगडा झाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांना फोन केला. पण यावेळी आपण पकडले जाऊ या भितीपोटी आरोपीने बॅग तिथेच सोडून पळ काढला होता. पण पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान पीडित तरुणीच्या कुटुंबाला कळवण्यात आलं आहे. 

मृत तरुणी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शहापुरा परिसरात वास्तव्यास होती. शीतल कौशल असं या तरुणीचं नाव आहे. तर आरोपी विनोद ठाकूर हरियाणाच्या पलपल येथेली असबटा मोडचा राहणारा आहे.

कुल्लू जिल्ह्याचे पोलीस महासंचालक कार्तिकेयन गोकुलचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळमधील तरुणी शीतल कौशल 13 मे रोजी हरियाणामधील विनोद ठाकूरसह मनाली फिरण्यासाठी आली होती. हॉटेल केडी विलामध्ये त्यांनी रुम बूक केली होती. 302 नंबर रुम तरुणीच्या नावार बूक करण्यात आली होती. 

चेकआऊट केल्यानंतर विनोद एकटाच बाहेर पडत होता. त्याने बस स्टँडवर जाण्यासाठी टॅक्सी मागवली. यावेळी त्याच्या हातात जड बॅग होती. ही बॅग तो गाडीत टाकत असतानाच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली. बॅग फार जड असल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी यानंतर पोलिसांना फोन करुन ही शंका सांगितली. आरोपीला पोलिसांना बोलावल्याचं समजताच तेथून फरार झाला. 

पोलिसांना तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी टॅक्सीत ठेवण्यात आलेली बॅग उघडून पाहिली असता त्यात तरुणीचा मृतदेह पाहून खळबळ उडाली. हॉटेलमध्ये रुम बूक करताना तरुणीने जमा केलेल्या आधार कार्डच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली. दुसरीकडे फरार आरोपील पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी लावली. रात्री उशिरा अखेर आऱोपीला पकडण्यात आलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. आयीपीसी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरु आहे. पीडित तरुणी आणि आरोपी तरुणात काय नातं होतं याचा तपास सुरु आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबाला माहिती दिली आहे. तिचा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

Read More