Marathi News> भारत
Advertisement

8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा

 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 व्या वेतनआयोगा विषयी वक्तव्य केलं आहे. 

8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा

नवी दिल्ली : 8th Pay Commission latest News : 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेत असलेल्या आणि 8 व्या आयोगाच्या प्रतिक्षेत असेलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. 8 व्या वेतन आयोगाबद्दल मोदी सरकारकडून (Modi Government) मोठा खुलासा करण्यात आला आहे.

संसदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींचा खुलासा 

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेंशनचा पुनर्विचार करण्यासाठी करण्यासाठी 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्याचा सरकारचा तूर्तास तरी कोणता विचार नाहीये. 

8 वा वेतन आयोगाबाबत कोणताही विचार सुरु नाही. सातव्या आयोगानुसार कर्मचारी आणि पेंशनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेंशनच्यासाठी आणखी एका वेतन आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता पडायला नको. त्यामुळे सध्यातरी असा कोणताही विचार नाही. असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत म्हटलं.

 

Read More