Marathi News> भारत
Advertisement

'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनविण्याचा मोदींचा मंत्र

आपल्याला आत्मनिर्भय व्हायचे आहे. त्याचवेळी आता 'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनवायची आहेत, असे मोदी  म्हणाले.

'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनविण्याचा मोदींचा मंत्र

नवी दिल्ली :  आपल्याला आत्मनिर्भय व्हायचे आहे. त्याचवेळी आता 'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनवायची आहेत,असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येत आहे.  पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर  मोदी आज काय बोलणार?, कुठली घोषणा करणार याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी नवीन अशी मोठी घोषणा केलेली नाही. 

देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे. एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. 'वोकल फॉर लोकल' जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोरोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.

आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषीमालाचा पुरवठा करु शकतो. विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवे तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ते आत्मनिर्भर होतील. 

आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहेत, असे मोदी म्हणाले. 

दरम्यान, कोरोनाची लढाई आपणाला जिंकायची आहे. कोरोनाने सगळयांना रोखून धरले आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू शकतो, आत्मविश्वास त्यांनी देशावासियांना दिला.  आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

Read More