Marathi News> भारत
Advertisement

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

अपघाताचे भयानक आकडे 

यमुना एक्स्प्रेस वे-वर वाहनचालक भरधाव वेगाने गाड्या चालवत असतात आणि त्यामुळेच अनेक अपघात होतात. यमुना एक्सप्रेस वे इंडिस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) च्या आकड्यांवर नजर टाकली तर अपघाताचे भयानक आकडे समोर येतात.

तब्बल ७०५ जणांचा मृत्यू

२०१२ ते २०१८ या कालावधीत झालेल्या अपघातात तब्बल ७०५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०१२ मध्ये सुरु करण्यात आलेल्या यमुना एक्स्पेस वे-वर झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत २०६५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. दररोज या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू होतो किंवा जखमी होतात असंही समोर आलं आहे.

तब्बल ७,५०० नागरिक जखमी

YEIDA च्या आकड्यांनुसार, यमुना एक्सप्रेस वे-वर २०१२ ते २०१८ या कालावधीत ४,९०० रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ७,५०० नागरिक जखमी झाले आहेत तर ७०५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आग्रा डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या आकड्यांनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत युमना एक्सप्रेस-वेवर २.३ कोटी ओव्हर स्पीड वाहनांची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी केवळ १८ हजार वाहनचालकांनाच दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More