Marathi News> भारत
Advertisement

Modi Government : मोदी सरकारचा गेल्या आठ वर्षांत जाहिरातींवर 6,500 कोटींचा खर्च; कॉंग्रेस म्हणतं, "स्वतःचे फोटो छापले असते पण..."

Modi Government : मोदींना हवं असतं तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी सहा हजार 500 रुपये खर्च केले आहेत, अशी टीका कॉंग्रेसने ट्विट करत केली आहे.

Modi Government : मोदी सरकारचा गेल्या आठ वर्षांत जाहिरातींवर 6,500 कोटींचा खर्च; कॉंग्रेस म्हणतं,

Parliament Winter Session : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने (PM Modi Government) गेल्या आठ वर्षात जाहीरातींवर (Advertisiment) तब्बल 6 हजार 500 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देण्यात आलीय. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिलीय. सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातींवर 3,260.79 कोटी आणि प्रिंट मीडियावरील जाहिरातींवर 3,230.77 कोटी खर्च केले. ही माहिती समोर आल्यानंतर कॉंग्रेसने जोरदार टीका केलीय. 

अनुराग ठाकूर यांनी दिली माहिती

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे तमिळनाडूतील खासदार एम सेल्वारासु यांच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिलय. सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनद्वारे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक जाहिरातींसाठीच्या खर्चाचे वर्षनिहाय विभाजन करुन ठाकूर यांनी ही माहिती दिली.

2016 - 2017 आर्थिक वर्षात सर्वात जास्त खर्च

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 पासून 2016 - 2017 या आर्थिक वर्षांपर्यंत सर्वात जास्त म्हणजेच 609.15 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मीडियावर खर्च केले आहेत. 2015 -16 या आर्थिक वर्षात 531. 60 तर  2018-19 या आर्थिक वर्षात 514.28 कोटी रुपये खर्च केले आहेत. या वर्षी 7 डिसेंबरपर्यंत, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरातींसाठी अनुक्रमे 91.96 कोटी आणि 76.84 कोटी खर्च झाला आहे, अशी आकडेवारी सांगते.

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2017-18, 2020-21, 2021-22 आणि 2017-18, 2022-23  या वर्षांचा अपवाद वगळता इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडियामध्ये जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे.

कॉंग्रेसची टीका

"6 हजार 500 कोटी! मोदी सरकारने सन 2014 ते आतापर्यंत जाहिरातींवर 6 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत," असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. "मोदींना हवं असतं तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी सहा हजार 500 रुपये खर्च केले आहेत," अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.

Read More