Marathi News> भारत
Advertisement

गाडीमध्ये पेट्रोल-डिझेल कमी असल्यावर भरावा लागणार दंड? जाणून घ्या नियम

या संदर्भात एक चलान सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते

गाडीमध्ये पेट्रोल-डिझेल कमी असल्यावर भरावा लागणार दंड? जाणून घ्या नियम

काही दिवसांपूर्वी केरळच्या वाहतूक पोलिसांनी कापलेल्या (kerala traffic police fine) एक चलान दंडाची पावती सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्या व्यक्तीला 250 रुपयांचा दंड भरावा लागला होता. त्याच्या पावतीवर वाहनात इंधन कमी आहे (Low Fuel) असे कारण लिहिले होते. या चलनाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. कारण पहिल्यांदाच अशा प्रकारची चलान दंडाची पावती समोर आली होती.

केरळमधील एका व्यक्तीने आपल्या चलन पावतीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. चलनाच्या पावतीमध्ये दंडाचे कारण वाहनात इंधन आहे असे नमूद केले होते. मात्र त्या व्यक्तीने दावा केला होता की त्याने चुकीच्या बाजूने बाईक चालवली होती, ज्यासाठी त्याच्याकडून 250 रुपये घेण्यात आले होते. त्यावेळी घाईमुळे त्याने पावती पाहिली नाही. त्यानंतर त्या पावतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अशा प्रकारचे चलन चर्चेचा विषय ठरले आहे.

जाणून घ्या नियम

असे चलान पहिल्यांदाच समोर आले असले तरी त्यासंबंधीचे नियम खरेच अस्तित्वात आहेत. मात्र हा नियम विशेषतः व्यावसायिक दुचाकींसह व्यावसायिक वाहनांना लागू होतो.

नियमांनुसार, जर एखादे व्यावसायिक वाहन प्रवाशासोबत इंधन भरण्यासाठी थांबले, तर पोलिस 250 रुपयांपर्यंतचे चलन करू शकतात. म्हणजेच जे लोक प्रवाशांना बसवून इंधन किंवा सीएनजी भरण्याचे काम करतात, त्यांच्या विरोधात हे नियम आहेत. पण सामान्यत: पोलीस असे चलान देत नाहीत.

Read More