Marathi News> भारत
Advertisement

नवीन TVS Apache RR 310 या दिवशी भारतात होणार लॉंच; जाणून घ्या जबरजस्त फीचर्स

TVS मोटार कंपनी आपली  TVS Apache RR 310 बाईक लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

नवीन TVS Apache RR 310 या दिवशी भारतात होणार लॉंच; जाणून घ्या जबरजस्त फीचर्स

नवी दिल्ली : TVS मोटार कंपनी आपली  TVS Apache RR 310 बाईक लॉंच करण्याच्या तयारीत आहे.  कंपनी आपल्या या फ्लॅगशिप बाईकला भारतीय बाजारांमध्ये 30 ऑगस्ट2021 रोजी लॉंच करणार आहे. कंपनी या बाईकला आधीच लॉंच करणार होती. परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या बाईकचे लॉंचिंग टळले आहे. कंपनीने या बाईकच्या फीचर्समध्ये मोठे बदल केले आहेत. तसेच कॉस्मॅटिकली काही बदल दिसून येतील. 

रिपोर्टच्या मते, Apache RR 310 इंडनला रिफाईन केले जाऊ शकते. याशिवाय पुढील डिझाईनला सुद्धा रिवाइज्ड केले जाऊ शकते.  TVSने सलग गेल्या काही वर्षापासून आपल्या Apache बाईक मध्ये बदल केले आहेत. कंपनीने गेल्याच वर्षी या बाईकमध्ये नवीन फीचर सामिल केले होते. यामध्ये राइड-बाय-वायर टेक्नॉलॉजीसह चार रायडिंग मोड्स सामिल झाले आहे. यामध्ये वर्टिकली - माउंटेड टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. जी नवीन जनरेशनSmartXonnect ब्लूटूथ सिस्टिम आणि रायडिग टेलिमेंट्रीने जोडली आहे.

किंमत
कंपनीने याआदी 2020 मध्ये Apache RR 310  च्या किंमतींमध्ये 5000 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर आता तिची मुंबईतील एक्स शोरूम प्राइज 2 लाख 54 हजार 990 इतकी आहे. Apache RR 310 ही बाईक KTM RC 390 पेक्षा स्वस्त आहे.

फीचर्स
इंजिन - 313सीसी सिंगल सिलिंडर, फ्युअल इंजेक्टेड
ट्रॅक मोड आणि स्पोर्ट मोड 
6 स्पीड गिअर  बॉक्स  ट्रान्समिशन, स्लिपर क्लच सह

Read More