Marathi News> हेल्थ
Advertisement

लग्नाची तारीख जवळ आल्यावर तुमच्या पार्टनरला वाटतेय 'ही' भिती? अशावेळी काय कराल, जाणून घ्या

या भितीमागे आपलं लग्न करतो हा निर्णय चुकीचा आहे का या शंकेची पाल चुकचुकायला लागते. 

लग्नाची तारीख जवळ आल्यावर तुमच्या पार्टनरला वाटतेय 'ही' भिती? अशावेळी काय कराल, जाणून घ्या

Relationship Tips: मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात होतं आणि प्रेमाचं लग्नात. अर्थात प्रत्येकालाच आपलं नातं हे लग्नापर्यंत घेऊन जायचं असतं. प्रत्येका कपलची इच्छा ही पुर्ण होतेच. परंतु अनेकदा अशीवेळ येते की जसजशी लग्नाची तारिख जवळ येत जाते तशी अनेक कपल्समध्ये भांडणंही सुरू होतात आणि याचे कारण असते भिती. या भितीमागे आपलं लग्न करतोय हा निर्णय चुकीचा आहे का? या शंकेची पाल चुकचुकायला लागते. 

लग्न करण्याचा निर्णय घाईत तर घेतला नाही ना? ही त्यामागची भावना असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे कारण ही भीती लग्नाची चिंताच फक्त असून शकते अशातला भाग नाही तर त्यामागे काही गैरसमजही असू शकतात. यावर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता हे जाणून घ्या. 

- जर तुमच्या जोडीदाराला पुन्हा पुन्हा राग येत असेल तर तुम्ही प्रथम धीराने त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. असे केल्यावर कदाचित त्यांचा राग थोडा कमी होईल. त्यांचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतर तुम्ही उत्तर द्या.

- आपले नाते पुढे चांगले चालेल की नाही याबद्दल तुमच्या जोडीदाराला अजूनही काही शंका असू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला खात्री द्या की तुम्ही दोघेही वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. तुमच्या जोडीदाराला व्हॉइसमेल पाठवून तुमचे मन मोकळे करा. बोलून प्रश्न नक्कीच सुटतो. 

- तुम्ही तुमच्या जोडीदाराला कशाची भीती वाटते हे देखील विचारू शकता. अशा परिस्थितीत पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला कारण यावरून ते का घाबरत आहेत यावरून त्यांच्या मनात काय चालले आहे ते कळेल. 

- एकत्र बोलणे हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो. अशा वेळी जोडीदाराला समजावून सांगा की जुन्या अनुभवामुळे त्यांच्या मनात लग्नाबद्दल नकारात्मक विचार नाहीत ना? असे असेल तर तुमचे मुद्दे नीट समजावून सांगा आणि नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.

- असे म्हणतात की ज्याचे लग्न झालेले आहे तेच लग्नाच्या अनुभवाबद्दल अधिक सांगू शकतात तेव्हा अशा परिस्थितीत आपण आपल्या जोडीदाराबद्दल कुटुंबातील समजदार व्यक्ती, इतर कोणत्याही जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीशी बोलू शकता. कोणाशी बोलून जोडीदाराचा संभ्रम दूर होऊ शकतो.

Read More