Marathi News> हेल्थ
Advertisement

खाण्या-पिण्यातील 'या' 5 गोष्टी आहेत दाताच्या कट्टर शत्रू, यातील सर्वच तुम्ही हमखास खाता!

तुम्हा या गोष्टी खात-पित असाल तर वेळीच व्हा सावध!

खाण्या-पिण्यातील 'या' 5 गोष्टी आहेत दाताच्या कट्टर शत्रू, यातील सर्वच तुम्ही हमखास खाता!

Dental Health : तुम्हाला दात साफ ठेवण्यासाठी डॉक्टर दिवसभरातून दोनवेळा साफ करण्याचा सल्ला दिला जातो. नाहीतर दातांवर एक थर जमा होतो त्यामुळे हिरड्यांचे आजार आणि दाताला किड लागण्याची शक्यता असते. दात हे स्वच्छ करण्यासोबतच ते मजबूत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या दातांना किड लागण्याची किंवा ते खराब होण्याची शक्यता असते.  

जेव्हा तुम्ही बाजारात ब्रेड घ्यायला जाल तेव्हा नक्कीच विचार करा. जेव्हा तुम्ही ब्रेड चघळता तेव्हा तोंडात असलेली लाळ स्टार्चचे साखरेत तुकडे करते. जेव्हा ब्रेड तुमच्या तोंडात चिकट पेस्ट सारख्या पदार्थात बदलते तेव्हा ते दातांमधील अंतरांना चिकटते, ज्यामुळे फट पडू शकते त्याऐवजी धान्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी खा.

fallbacks

आम्हाला अनेकदा कार्बोनेटेड पेय टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात सोडा असतो, ते तुमच्या दातांसाठी खूप हानिकारक आहे. कार्बोनेटेड सोडा तुमच्या दातांच्या इनॅमलवर हल्ला करतो. जेव्हाही तुम्ही अशा प्रकारचे पेय प्याल तेव्हा दात पूर्णपणे ऍसिडने झाकले जातात, गडद रंगाचे सोडा पेये आणखी हानिकारक असतात, ते प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नका, अन्यथा दातांना जास्त नुकसान होईल.

सर्व प्रकारच्या कँडीज तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. कारण आंबट कँडीजमध्ये अधिकाधिक प्रकारचं ऍसिड असतं जे तुमच्या दातांवर जोरदार हल्ला करतं. आपण कँडी खाताना ते चघळून खातो त्यावेळी वितळलेली कँडी दातांवर जाऊन बसते. याचा परिणाम असा होती की तुमचे दात सडण्याचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे हे खाणं टाळा नाहीतर खाऊन झाल्यावर लगेच दात स्वच्छ करा.

fallbacks

दारू पिणे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसते हे सर्वांनाच माहित आहे. जेव्हा तुम्ही दारूचं सेवन करता तेव्हा तुमचे तोंड कोरडं पडतं. कोरड्या तोंडात लाळेची कमतरता असते, जी आपल्याला आपले दात निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. लाळ अन्नाला दातांना चिकटण्यापासून रोखते आणि अन्नाचे कण धुवून टाकते.  दात किडणे, हिरड्यांचे रोग आणि इतर तोंडी संसर्गाची प्रारंभिक लक्षणे बरे करण्यास देखील मदत करते. 

fallbacks

आपल्यापैकी बर्‍याच जणांना आईस्क्रीम खायला आवडते, पण ते आपल्या दातांना 2 प्रकारे इजा करते, एक तर याच्या गोडपणामुळे दात किडतात, तसेच ते इतके थंड असते की त्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढते जाते. 

fallbacks

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read More