Marathi News> हेल्थ
Advertisement

Sleeping Position वरून तुमचं व्यक्तिमत्त्व ते ब्लॅक & व्हाईट स्वप्न! जाणून घ्या झोपेविषयी भन्नाट फॅक्ट्स...

World Sleep Day 2023: सध्याच्या युगात शांत झोप मिळणे दुर्मिळच (Sleep Disorders) झाले आहे. त्यातून आपली जीवनशैली ही इतकी बदलते आहे की, आपल्याला दुपारची झोपही मिळत नाही. आज वर्ल्ड स्लिप डेच्या (World Sleep Day) निमित्ताने जाणून घेऊया झोपेसंबंधीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स!

Sleeping Position वरून तुमचं व्यक्तिमत्त्व ते ब्लॅक & व्हाईट स्वप्न! जाणून घ्या झोपेविषयी भन्नाट फॅक्ट्स...

World Sleep Day 2023: आपल्या आयुष्यात झोप ही महत्त्वाची आहे. झोपेला आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे परंतु झोपेच्या शास्त्रीय महत्त्वाप्रमाणे(Scientific Facts of Sleep) तुम्हाला माहितीये का की झोपेच्या काही अशा रंजक गोष्टीही आहेत ज्या तुम्हालाही कदाचित माहिती नसतील. जगात झोपेवर अनेकदा संशोधन (Scientific Research of Sleep) होताना दिसते. त्या संशोधनात अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. झोप आपल्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून आराम देते. त्यातून आपल्याला दिवसातून 8 तास झोप ही महत्त्वाची असतेच. अपुऱ्या झोपेचा आपल्या आरोग्यावरही होतो आणि हा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो व तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. आज 'वर्ल्ड स्लिप डे' (World Sleep Day) आहे या निमित्ताने जाणून घेऊया झोपेविषयीच्या काही भन्नाट गोष्टी. 

झोपविषयी आपल्या सगळ्यांनाच कदाचित फार कमी माहिती असेल त्यातून झोप आणि स्वप्न याचेही अनोखे नाते आहे. मुळात स्वप्न पडण्यावरूनही अनेक मतप्रवाह आहेत. पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या स्वप्नातून दिसतात. त्याचबरोबर एकच स्वप्न हे सारखं सारखं पडणं त्यानंतर पुर्नजन्माचा (Sleep and Dream Theories) संबंध अशा एक नाही तर अनेक गोष्टी आपण वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील.

परंतु शास्त्रानुसार, स्वप्न पडणं हे आपल्या विचारांचेच प्रतिबिंब असते. आपले विचार कसे आहेत आणि त्यावेळी आपल्या भावना कशा जागृत होतात त्यावर ते अवलंबून असते. परंतु झोपेचा संबंध आपला व्यक्तिमत्त्वापासून, वय, लिंग, विचार आणि परिस्थिती यांच्याही संबंधित असू शकतो. तेव्हा जाणून घेऊया की टॉप इंटरेस्टिंग फॅक्ट्स 

  • असं संशोधन समोर आलं आहे की, 15 टक्के लोकं ही झोपेत चालतात. 
  • आपणचं एकमेव प्राणी आहोत जे झोपेशिवाय राहू शकतो. 
  • जपानसारख्या देशात कामाच्या ठिकाणी झोप आली तर तुम्हाला कोणी ओरडत नाही. 
  • संशोधनातून असं समोर आलंय की, 12 टक्के लोकं ही कृष्णधवल म्हणजे ब्लॅक एन्ड व्हाईट रंगात स्वप्न पाहतात. परंतु असेही कळते की, कलर टेलिव्हिजनच्या येण्याच्या आधी हे प्रमाण 75 टक्के इतके होते. 
  • द स्लिप काऊन्सिंगनुसार, जेव्हा आपण आपला पलंग बदलतो तेव्हा दुसऱ्या पलंगात आपल्याला 42 मिनिटांची एक्स्ट्रा झोप मिळते. 
  • काही तज्ञांनी असे समोर आणले आहे की आपल्या आवडत्या सिल्पिंग पोझिशनवरून आपले व्यक्तिमत्त्व जुळलेले आहे. 
  • असं म्हणतात की, रात्री झोपेत आपली वास घेण्याची क्षमता कमी होते. 
  • असंही म्हणतात की ज्यांची सॅलरी जास्त त्यांना जास्त झोप मिळते. 
Read More