Marathi News> हेल्थ
Advertisement

वर्ल्ड बुक डे: पुस्तकांची मैत्री तुम्हाला ठेवेल हेल्दी!

रात्री झोप येत नसेल तर पुस्तक वाचायला सुरुवात करा.

वर्ल्ड बुक डे: पुस्तकांची मैत्री तुम्हाला ठेवेल हेल्दी!

मुंबई : रात्री झोप येत नसेल तर पुस्तक वाचायला सुरुवात करा. वाचनामुळे मेंदूच्या नसा शांत होतात आणि हळूहळू झोप येऊ लागते. अन् नकळत तुम्ही झोपी जाता. म्हणून तुमच्या आवडीचे पुस्तक झोपण्यापूर्वी थोडा वेळ नक्की वाचा. वाचनाने माणूस समृद्ध होतो. पुस्तकासारखा प्रामाणिक मित्र नाही, हे तुम्ही वारंवार ऐकले असेल. आता वेळ आली आहे पुस्तकांना आपला मित्र बनवण्याची... म्हणून या वर्ल्ड बुक डे निमित्त स्वतःला वाचनाची ही चांगली सवय लावा...

१. तुम्ही जितके वाचाल तितके तुमचे ज्ञान वाढेल. विविध विषयांची माहिती तुम्हाला मिळेल. वाचनामुळे तुम्ही लोकांशी आत्मविश्वासाने संवाद साधू शकाल. 

२. वाचनामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, चांगल्या बातम्या वाचल्याने हृदयाची गती सुरळीत होते. हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

३.मूडही प्रेश राहतो. रागात असला किंवा उदास असाल अथवा एकटे वाटत असेल तर पुस्तक वाचायला सुरुवात करा. तुम्हाला चांगले वाटेल.

४. वाचनामुळे विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता विकसित होते. यामुळे मनात नवे नवे विचार येतात. तुमचे विचार अधिक प्रगल्भ आणि रचनात्मक होतात.

५. जसंजसे वय वाढते, मेंदूचे कार्य मंदावते. अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते. त्यामुळे लहानपणापासूनच चांगली पुस्तके वाचनाची सवय लावून घ्या. त्यामुळे वाढत्या वयातही मेंदू उत्तमरित्या कार्य करतो.

६. तज्ञांनुसार, वाचनाचा आणि स्मरणशक्तीचा जवळचा संबंध असतो. वाचनाने मेंदूच्या पेशी तेज आणि सक्रिय होतात. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. 

Read More