Marathi News> हेल्थ
Advertisement

कॅप्सूल 2 वेगवेगळ्या रंगांनी का बनवलेली असते? जाणून घ्या काय आहे या मागचं कारण

कॅप्सूलच्या दोन्ही भागाचा रंग वेगवेगळा असतो. काय आहे मागचं कारण?

कॅप्सूल 2 वेगवेगळ्या रंगांनी का बनवलेली असते? जाणून घ्या काय आहे या मागचं कारण

मुंबई : तुम्हाला माहितीये का की कॅप्सूल ही 2 रंगांचीच का असते. औषधं (Medicine) विविध रंगांची असतात. त्यातच कॅप्सूल (Capsule) दोन रंगामध्ये येते. कॅप्सूल एका रंगाची देखील असू शकते. पण 2 रंग ठेवण्यामागचं कारण आहे? जाणून घ्या.

कॅप्सूल दोन रंगांमध्ये असते. दोन्ही भागाचा रंग वेगवेगळा असतो. कॅप्सूलचा एक भाग कॅप (Cap) तर दुसरा भाग कंटेनर (Contenor) असतो. कॅप्सूल कंटेनरमध्ये औषध ठेवलं जातं. तर कॅपने तिला बंद केलं जातं. कॅप्सूल उघडून पाहिली तर त्यामध्ये एका भागात औषध आणि एक भाग रिकामा दिसेल.

कॅप्सूल 2 रंगाची का असते

कॅप्सूलची कॅप आणि कंटेनरचा रंग वेगवेगळा असतो. याचं कारण म्हणजे, कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही गैरसमज होऊ नये की, कंटेनर कोणता आणि कॅप कोणती. कॅप्सूलची कॅप आणि कंटेनर वेगवेगळ्या रंगाची बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक पैसे मोजावे लागतात.

कशा पासून बनते कॅप्सूल?

औषधांची कॅप्सूल जिलेटिन आणि सेलूलोज पासून बनवली जाते. काही देशांमध्ये जिलेटिनपासून कॅप्सूल बनवण्य़ावर बंदी आहे. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही कॅप्सूल बनवण्यासाठी जिलेटिनच्या ऐवजी सॅलूलोजपासून बनवण्याचे आदेश दिले आहेत.

Read More