Marathi News> हेल्थ
Advertisement

स्तनांमध्ये सूज जाणवतेय; ही 5 कारणं असू शकतात

स्तनांना सूज येण्याचं सामान्य कारण premenstrual syndrome मानलं जातं.

स्तनांमध्ये सूज जाणवतेय; ही 5 कारणं असू शकतात

मुंबई : अनेकदा महिलांना त्यांच्या स्तनांमध्ये जडपणा जाणवतो. काही स्त्रिया ही परिस्थिती गांभीर्याने घेतात, तर काही ती सामान्य मानतात. स्तनांमध्ये जडपणा हे स्तनांना सूज येण्याचं लक्षण असू शकतं. दरम्यान स्तनांमध्ये सूज येण्याची कारणं आणि लक्षणं अनेक आहेत. 

स्तनांना सूज येण्याचं सामान्य कारण premenstrual syndrome मानलं जातं. जेव्हा महिलांना मासिक पाळी येते तेव्हा त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात. याशिवाय आणखी काही कारणं आहेत, ज्यामुळे स्तनामध्ये सूज येऊ शकते.

  • गरोदरपणात शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळेही स्तनांना सूज येऊ शकते.
  • फायब्रोसिस ब्रेस्ट डिसीजमध्येही स्तनामध्ये सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.
  • महिला जेव्हा गर्भनिरोधक गोळ्या घेतात तेव्हाही स्तनांना सूज येण्याची शक्यता असते
  • स्तनावर सूज येण्याचं अजून एक कारण म्हणजे कॉफीचे जास्त सेवन करणं किंवा आहारात मिठाचं प्रमाण वाढणं.
  • ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या महिलांच्या स्तनांना देखील सूज येऊ शकते

स्तनांना सूज येण्याची लक्षणं

  • स्तन उबदार वाटणं
  • स्तनांमध्ये जडपणा जाणवणे.
  • स्तनांना स्पर्श केल्यावर गाठीसारखं जाणवणं
  • स्तनाच्या त्वचेत बदल होणं
Read More