Marathi News> हेल्थ
Advertisement

Health Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून

Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते

Health Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून

Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते. त्याचबरोबर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर त्यांचे पालक बदाम खायला देतात जेणेकरून त्यांनाही त्याचा चांगला फायदा होवो, बुद्धी वाढवण्यासाठी आपण बदाम खातो आपल्याला त्याचा फायदाही (soaked almonds benefits) चांगलाच होतो. काहींना बदाम हे सुखे खायला आवडतात अथवा त्यांना भिजवलेले बदाम खायला आवडतात. परंतु काहींना असाही प्रश्न पडतो की ही बातमी आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) नक्कीच फायदेशीर आहे की नाही, काहींना भिजवलेल्या बदामाचा आपल्या शरीरासाठी फायदा काय असा प्रश्न पडतो. तेव्हा जाणून घेऊया की या क्षेत्रातील तज्ञांचे काय मतं आहे. (what are the health benefits of soaked almonds does it really help your fitness know more)

बदामाचे फायदे काय आहेत? 

- बदाम भिजवून खाल्ल्यानं तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यानं दातांचे आरोग्य चांगले राहते. हल्ली लोकं बाहेरचं खूप खातात त्यामुळे आपल्याला कळतं नाही की आपल्या दातांचे आरोग्य कसे आहे. नुसतं ब्रश करणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसते त्यामुळे आपल्याला त्याचा त्रासही होतो. त्यातून दातांमध्ये (Almonds for Teeth) कीड येण्याचे प्रमाणही लोकांमध्ये वाढले आहे तेव्हा भिजवलेले बदामा खाल्ल्यानं तुमच्या दातांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. 

- भिजवलेले बदाम खाल्ल्यानं तुम्हाला असणारा अपचनाचा त्रास कमी होतो. वर म्हटल्याप्रमाणे लोकांना बाहेरच काढण्याची चटक लागली आहे, त्यामुळे आपल्याला अपचनाचाही (Digestion) त्रास होतो अशावेळी हा त्रास कमी करण्यासाठी आपण भिजवलेले पदार्थ खाऊ शकतो. 

- भिजवलेले बदाम खाल्ल्यानं तुमच्या शरीरात न्यूट्रिएंटचेही प्रमाण वाढलेले आहेत. 

बदाम भिजवून खाणं किती फायदेशीर? 

बदामामध्ये असणारे फायटिक एसिडचे प्रमाण बदाम भिजवल्यानंतर कमी होते.  त्यामुळे आपल्याला बदाम भिजवून खाल्ल्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. जर तुम्ही बदाम कच्चे खाल्लेत तर तुम्हाला फायटिक एसिडचा सामना करावा लागतो ते तुमच्या शरीरात गेले तर तुम्हाला त्याचा मोठा परिणाम शरीरावर करून घ्यावा लागतो. त्यातून कच्च्या बदामापेक्षा ओले म्हणजे भिजवलेले बदाम खाणं जास्त सोप्पंही जातं. 

बदामामध्ये ही पोषक तत्त्वे असतात - 

बदाम खाण्याने आपल्या शरीराला फायदा होता. बदामात फायबर, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन ई, मॅगनीज, मॅग्नेशियम अशी पोषक तत्त्वे आढळतात. त्याचबरोबर बदामात प्रोस्फरस, व्हिटॅमिन बी टू आणि कॉपरही असते. 

Read More