Marathi News> हेल्थ
Advertisement

Weight Loss:वाढत्या वजनाने हैराण ? पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करा Tips

Diet Plan फॉलो करा, होतील फायदेच फायदे

Weight Loss:वाढत्या वजनाने हैराण ? पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करा Tips

Weight Loss Diet Plan: वजन वाढवणं सोपं असलं तरी वजन कमी करणं सोपं काम नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल आणि त्यासोबतच तुमच्या आहारात देखील बदल करावा लागेल. जर तुमचे वजन खूप वाढले असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर अतिशय प्रभावी आहार घ्यावा लागतो. व्यवस्थित डायट फॉलो केल्याने तुमचे वजन फक्त 20 दिवसात कमी होण्यास सुरूवात होईल. (weight loss and healthy eating tips how to lose weight with proper diet)

सकाळी सकाळी लिंबू पाणी प्या-

रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने आरोग्याला फायदा होतो. त्यामुळे शरिरातील बल्ड सर्कुलेशन सुरळीत राहण्यास मदत होते. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने शरीराला दुप्पट फायदे होतात. लिंबू पाण्यात Vitamin C असल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर PH नियंत्रणात राहतो. अतिरिक्त चरबी देखील कमी होते आणि वजन कमी ( Weight Loss) होते. किडनी स्टोनच्या समस्येपासून कायमी सुटका देखील होते.

नाष्टा करताना (Breakfast) तुम्ही मुग डाळीचा वापर केलेले पदार्थ खाऊ शकता. बेसन प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्याने बेसनचं धीरडं हा एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे. थोड्या वेळाने Green Tea प्या. सकाळी 11 वाजेपर्यंत मसालेदार चहा प्या, वजन कमी करण्यास खूप मदत होते.

दुपारचं जेवण -

दुपारच्या जेवणामध्ये (Lunch) कमी उष्मांक असलेले पदार्थ खावेत. जेवण करताना ओट्स रोटीसह एक वाटी भाजी खाऊ शकता. याचबरोबर जेवणामध्ये दही आणि सॅलड्चा समावेश आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. दुपारचं जेवण झाल्यानंतर साधारण 4 वाजेपर्यंत नारळ पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळण्यास मदत होते.

रात्रीचं जेवण-

रात्रीच्या जेवणात (Dinner) तुम्ही भाज्यांचे सुप पिऊ शकता. यासोबतच काळे बीन्स, राजमा, नेव्ही बीन्सचा समावेश उपयुक्त ठरतो. रात्रीच्या जेवणात हलकं अन्न खाणं नेहमी फायद्याचं ठरतं. तुम्ही जर सतत तणावाखाली असाल तर वजन कमी होणार नाही. तणावाच्या काळात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. या हार्मोनचे प्रमाण वाढले की त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो.

(Disclaimer:दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

Read More