Marathi News> हेल्थ
Advertisement

चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारखी बिकट आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर अगदी मुलं आजारी पडत असून श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या आहे. जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही. 

चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 मध्ये नियम कमी झाल्यामुळे मुलांमध्ये फ्लू पसरत आहे. चीनने गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर देताना सांगितलं की, मुलांमध्ये न्यूमोनिया वाढल्यामुळे हा कोणताही असामान्य किंवा नवीन आजार नाही. कोविडवरील निर्बंध कमी केल्यामुळे फ्लू सारखे आजार वाढत आहेत. 

चीनमध्ये न्यूमोनियासारख्या आजारांच्या वाढत्या प्रकरणांमुळे तणाव वाढतो कारण कोविडची सुरुवात चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. यानंतर कोविड जगभरात पसरला आणि याचे महामारीत रुपांतर झाले. चीनमध्ये न्युमोनिया सारखे आजार वाढत असल्यामुळे जगाचंही टेन्शन वाढल आहे. कारण 2019 मध्ये चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये कोविडला सुरुवात झाली आहे. यानंतर कोविड जगभरात पसरला आणि महामारीत रुपांतर झालं. 

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी फेंग यांनी सांगितलं की, रुग्णांची संख्या पाहता चीनमध्ये पीडियाट्रिक क्लिनिक्स सुरु करण्यात येत आहेत. लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना सर्वात जास्त लस देण्याचे आदेश चीनने दिले आहेत. तसेच लोकांनाही सतत मास्क लावण्याचा आणि हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, चीनमध्ये हा आजार वाढत असल्याने काळजी करण्याची गरज नसल्याचे चिनी डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञ म्हणतात की, कोविडनंतर अनेक देशात हा आजार पसरतोय. 

उत्तराखंडमध्ये सापडले रुग्ण?

जागतिक आरोग्य संघटनेनेही सर्व देशांना याबाबत अलर्ट जारी केला आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही देशातील सर्व राज्यांना पाळत ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात पाळत वाढवली पाहिजे. उत्तराखंडमध्ये अद्याप असे कोणतेही प्रकरण नाही, परंतु खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना रुग्णालयांमध्ये विशेष दक्षता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन बेड, वॉर्ड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

अलर्टमोडवर सरकार 

उत्तराखंडच्या सर्व जिल्हाधिकारी आणि सीएमओ यांना उत्तराखंड आरोग्य विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. मुले आणि वृद्धांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क आणि रुमाल वापरावा. हात साबणाने आणि पाण्याने धुवून स्वच्छ ठेवावेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

Read More