Marathi News> हेल्थ
Advertisement

काळजी घ्या! मधुमेहाचे आणखी एक धोकादायक लक्षण समोर; अशी करा तपासणी

Diabetic Ketoacidosis Symptoms In Marathi: भारतात मुधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशावेळी संशोधकांनी आणखी एक नवा दावा केला आहे. 

काळजी घ्या! मधुमेहाचे आणखी एक धोकादायक लक्षण समोर; अशी करा तपासणी

Diabetic Ketoacidosis Symptoms: भारतात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने टाइप-२ डायबेटीसच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मधुमेहाचे (Diabetes Symptoms) आणखी एक लक्षण समोर आले आहे. या लक्षणाकडे आपण सहज दुर्लक्ष करतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. (Diabetic Ketoacidosis Symptoms)

तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका हे मधुमेहाचे एक लक्षण असू शकते, असा दावा करण्यात येत आहे. मधुमेहाच्या या लक्षणाला कीटोअॅसिडोसिस असं म्हटलं जातं. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुमची ब्लड शुगर हाय असू शकते. डॉक्टर व संशोधकांनी खूप आधीच शोध लावला होता. मात्र, आता याबाबत अधिक चर्चा रंगली आहे. 

श्वासांना दुर्गंधी येऊ शकते

वेटवॉटर्सनुसार, डायबेटिक कीटोएसिडोसिस ही शरीरातील एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये इन्सुलिन कमी असल्याने रक्तात हानिकारक कीटोन्स निर्माण होतात आणि हा डायबिटीसचे एक असामान्य संकेत असू शकतो. मधुमेहामुळं श्वासांना दुर्गंधी येऊ शकते. कारण या परिस्थितीत तोंडा ग्लूकोजचा स्तर वाढू शकतो. जीवाणू या साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. ज्यामुळं नंतर संसर्ग आणि हिरड्यांचे आजार होतात. हिरड्यांचे आजार हे हॅलिटोसिसचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. 

 टाइप १ डायबिटीस लक्षण

श्वासांना फळांसारखा गंध येत असेल तर डायबिटिक कीटोएसिडोसिस नावाच्या धोकादायक स्थितीचा संकेत असू शकतो. म्हणजेच तुम्हाला टाइप १ डायबिटीसचे लक्षण असू शकते. योग्य प्रमाणात इन्सूलिन नसल्याने तुमच्या शरीराला ग्लूकोजच्या माध्यमातून आवश्यक ती एनर्जी मिळत नाही त्यामुळं कीटोन्स नावाचे रसायन उत्पन्न होते. अशावेळी शरीरात अतिप्रमाणात कीटोन्स जमा झाल्यास ते तुमच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकते. तोंडातून दुर्गंधी येणे हे एकमात्र लक्षण नसून तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा लाल होणे,  तसंच, उलटी येणे ही लक्षणेही जाणवतात.

अशी करा चाचणी

तुम्ही केटोन्सची पातळी तपासू शकता. केटोन टेस्ट किटच्या सहाय्याने लघवीद्वारे केटोन्सची पातळी तपासा. तुमच्या रक्तात केटोन्स जास्त असल्यास आणि श्वासाला दुर्गंधी येत असल्यास दुर्लक्ष करु नका, लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More