Marathi News> हेल्थ
Advertisement

लग्नानंतर तरुणींना येत या गोष्टींचं टेन्शन, दुर्लक्ष करु नका पण, सावध व्हा...

लग्नानंतर मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलते. 

लग्नानंतर तरुणींना येत या गोष्टींचं टेन्शन, दुर्लक्ष करु नका पण, सावध व्हा...

Weight Gain After Marriage: लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. एका मुलीला नवीन घरात नवीन लोकांसोबत आपलं आयुष्य जगायचं असतं. आई-वडिलांच्या छायेत लहानचे मोठे झालं असतो. लग्नानंतर मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलते. तुम्ही पाहिलं असेल लग्नानंतर मुलीचं वजन अचानक वाढतं. तुमचंही कदाचित लग्नानंतर वजन वाढलं असेल त्याचं तुम्ही टेन्शन घेतलं असेल. पण वजन वाढण्यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?

एका अभ्यासानुसार लग्नाच्या 5 वर्षांनंतर 82 टक्के कपल्सचं वजन 5 ते 10 किलो वजन वाढतं. यामध्ये जास्त जास्त संख्या ही तरुणींची असते. यामागे अनेक कारणं असतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, लग्नानंतर तरुणींचं का वाढतं वजन. 

1. सासरच्या मंडळींनुसार जेवण

लग्नापूर्वी तरुणी आपल्या मर्जीनुसार खातेपिते. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी ती आपल्या डाएटवर लक्ष ठेवून असते. मात्र लग्न झाल्यावर सासरच्या मंडळींनुसार तिला खावं लागतं. अगदी जेवण्याचा वेळाही बदलतात. सासरच्या मंडळी नाराज होऊ नये म्हणून ती आपल्या हेल्दी डाएट विसरून जाते. कधी कधी तर सगळ्यांचं जेवण झाल्यावर अन्न वाया जाऊन नये म्हणून जास्त खाल्लं जातं. 

2. फिटनेसकडे दुर्लक्ष 

लग्नानंतर मुलं आयुष्यासोबत तिचं राहणीमान तिची दिनचर्याच बदलून जाते. सासर आणि नवऱ्याच्या लाइफस्टाइलप्रमाणे बदलावं लागतं. अशात तिचं फिटनेस रुटीनकडे दुर्लक्ष होतं. 

3. हार्मोनलमध्ये अनेक बदल

लग्नानंतर सेक्सुअल लाइफमुळे डेली रुटीन आणि तुमचं इंटरनल बॉडीमध्ये अनेक बदल होतात. त्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे तुमचं वजन वाढतं. 

4. नातेवाईकांकडे पाहुणचार

लग्नानंतर नवीन जोडप्याला नातेवाईकांकडे जेवण्यासाठी बोलवलं जातं. तिथे त्यांचासाठी केलेल वेगवेगळे पदार्थ आग्रहासह खावे लागतात. यामुळेही कल्पसचं वजन वाढतं. 

5. स्ट्रेस लेवल वाढते

लग्नानंतर मुलींना खूप तणावाचा सामना करावा लागतो. तणावामुळे अनेक तरुणींना जास्त खाण्याची सवय असते. ज्यातून तरुणींचं वजन वाढतं.  

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)   

Read More