Marathi News> हेल्थ
Advertisement

पोट साफ ठेवण्यासाठी 'या' गोड पदार्थाचं सेवन करा, वजनही करा कमी

जर पोट ठिक नसेल तर आपल्या कामावर परिणाम होतो. आपण दिवसभर स्वस्थ आणि चिडचिड करतो. 

 पोट साफ ठेवण्यासाठी 'या' गोड पदार्थाचं सेवन करा, वजनही करा कमी

Digestion Problem : बदलेली जीवनशैली आणि बाहेरील खाण्यावरील वाढलेला कल यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यातील सगळ्यात कॉमन समस्यामध्ये पोटाचे विकार. अनहेल्दी फूड खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पोटावर सगळ्यात जास्त वाईट परिणाम होतो. जर पोट ठिक नसेल तर आपल्या कामावर परिणाम होतो. आपण दिवसभर स्वस्थ आणि चिडचिड करतो. 

पोट साफ करण्यासाठी तुमच्या किचनमधील एक पदार्थ तुम्हाला फायदेशीर ठरेल. हा पदार्थ अनेक घरांमधील किचनमध्ये असतो. पोट साफ करण्यासाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी या पदार्थ सेवन केल्यास पोटाच्या विकारापासून आराम मिळतो. 

रोज रात्री झोपताना काळ्या मनुका एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी सेवन करा. भिजवलेले मनुके खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात, असं ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव सांगतात. (trending news soaked raisins munakka benefits for digestion weight loss hair fall in marathi)

fallbacks


भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे

1. पोट साफ होतं

अपचन किंवा पोटदुखीची समस्या असेल तर भिजवलेले मनुके खाल्ल्यास तुम्हाला फायदा होईल. मनुकामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते आणि गॅसची समस्या दूर होते. 


2. वजन कमी होणार

जर तुमची पचनक्रिया बरोबर असेल तर भिजवलेले मुनके खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ग्लुकोज आणि फ्रक्टोजमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी होण्याची प्रक्रिया हळूहळू असते पण भिजवलेले मुनके खाल्ल्यात फायदा होतो. 

3. रक्त शुद्ध होतं

भिजवलेले मनुका खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि पिंपलपासून सुटका मिळतो. 

4. दातांची समस्या दूर होईल

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधीचा त्रास होत असेल तर भिजवलेले मनुके खाल्ल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. भिजवलेले मनुके खाल्ल्यास तोंडातील असलेले बॅक्टेरिया हळूहळू कमी होतात.

5. केसगळती थांबेल

तुमचे केस गळत असेल तर तुम्ही नियमितपणे मनुकांचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळतो. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असतं त्यामुळे केस घनदाट होण्यास मदत होते.  

Read More