Marathi News> हेल्थ
Advertisement

रोगाचे मूळ होण्यापूर्वी 'अशी' घ्या पोटाची काळजी!

जीवनशैली सातत्याने बदलत आहे.

रोगाचे मूळ होण्यापूर्वी 'अशी' घ्या पोटाची काळजी!

नवी दिल्ली : जीवनशैली सातत्याने बदलत आहे. ९-१० तास बसून चालणारे काम अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. त्याचबरोबर बाहेरचे अनहेल्दी अन्न खाणे, जेवणाच्या अवेळा याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्याचबरोबर चहा-कॉफीचे अतिरिक्त प्रमाण यामुळे देखील आरोग्याचे नुकसान होते. आपल्या या जीवनशैलीमुळे अॅसिडीटी, गॅस, अपचन आणि स्थुलता या समस्या सामान्य झाल्या आहेत.

स्थुलता ही भारतातील नाही तर जगातील मोठी समस्या झाली आहे. लहान लहान मुलं या समस्येला बळी पडत आहेत. असं बोलले जाते की, सर्व समस्या या पोटापासूनच सुरू होतात त्यामुळे स्वतःला फीट ठेवणे गरजेचे आहे.

कारणं

बदलत्या जीवनशैलीत पोटाची समस्या सामान्य झाली आहे. कामानिमित्त होणारे जागरण, तळलेले, मसालेदार पदार्थ, शारीरिक श्रमांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटाची समस्या वाढली आहे. म्हणून पोटाचे आरोग्य योग्य असल्यास इतर रोग होण्याची शक्यता कमी होते.

अॅसिडीटी

अन्न पचनासाठी पोटात तयार होणारे आम्ल म्हणजेच अॅसिड महत्त्वाचे कार्य करते. मात्र काही वेळेस या अॅसिडचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवते. तेलकट-मसालेदार पदार्थ हे अॅसिडीटीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अॅसिडीची समस्या असल्यास सकाळी उठल्यावर लगेचच पाणी प्या. आहारात फळांचा समावेश करा. नारळाचे पाणी अॅसिडीटी शमवण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर थंड पदार्थ खाणे लाभदायी ठरेल. 

अस्वस्थ आणि उलटीसारखे वाटणे

अस्वस्थ आणि उलटीसारखे वाटल्यास हलके अन्न घ्या. दह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

अल्सर

पोटात अल्सर होण्याचे प्रमुख कारण मसालेदार अन्नपदार्थ घेणे आहे. अशावेळी फळे, भाज्या खाणे अधिक फायदेशीर ठरते. योगसाधना किंवा ध्यान केल्यास आराम मिळेल.

गॅसची समस्या

खूप वेळ काही न खाल्यास किंवा मसालेदार पदार्थ खाल्यास गॅसची समस्या होत नाही. गॅसची समस्या असल्यास अधिकाधिक पाणी प्या. पाण्यात लिंबू, काळं मीठ घालून घेतल्यास गॅसपासून सुटका होते.

लूज मोशन

बदलत्या हंगामात अनहेल्दी किंवा खराब अन्नपदार्थ खाल्यास लूज मोशन होऊ लागतात. लूज मोशनमध्ये थकवा जाणवतो. अशावेळी हलके अन्न घ्या.

बद्धकोष्ठता

पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो. शौचास साफ होत नाही. भूक लागत नाही. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून घेणे फायदेशीर ठरेल.

Read More