Marathi News> हेल्थ
Advertisement

मुलींनो ! या '4' चुकांंमुळे वाढतेय केसगळती

सर्वसामान्यपणे केसगळतीचा हा केसांच्या आरोग्याचा एक भाग आहे. 

मुलींनो ! या '4' चुकांंमुळे वाढतेय केसगळती

 मुंबई : सर्वसामान्यपणे केसगळतीचा हा केसांच्या आरोग्याचा एक भाग आहे. केस येणं, वाढणं आणि गळणं ही प्रक्रिया सामान्य आहे. मात्र केसगळती ही प्रमाणापेक्षा अधिक असल्यास ती एक समस्या बनते. केसगळती हा त्रास वाढण्यामागे तुमच्या काही चूका कारणीभूत ठरतात. म्हणूनच केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी या 4 चूका टाळण्यास  हा त्रास कमी होण्यास मदत होईल.   

 कोणत्या चूका टाळायलाच हव्यात ?  

 गरम पाण्याने केस धुणं  

तुम्हांला सतत गरम पाण्याने केस धुण्याची सवय असेल तर ती टाळा. कारण गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिकरित्या असणारे तेल कमी होते. परिणामी केस शुष्क होण्याची शक्यता असते. हळूहळू हा त्रास वाढला की केसगळतीचाही त्रास वाढतो. 

ताण तणावात राहणं 

सतत तणावात राहिल्याने केसगळतीचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच तुमची कितीही धावपळ होत असली तरीही थोडा वेळ काढून ध्यानसाधना,मेडिटेशन करण्याकडे वेळ द्या.  

ड्रायरने केस सुकवणं 

ड्रायरच्या मदतीने केस सुकवल्याने ते अधिक शुष्क होण्याची शक्यता असते. ड्रायरमधील गरम हवा केसांमधील प्रोटीन घटक कमी होतात. यामुळे केसगळतीचा त्रास वाढतो. म्हणूनच केसांना सुकवण्यासाठी नैसर्गिक मार्गांचा पर्याय निवडा. 

केस स्वच्छ न करणं 

केसांची पुरेशी काळजी न घेतल्याने टाळूवर डेड सेल्स जमा होतात. यामुळे केसगातीचा त्रास वाढतो. म्हणूनच आठवड्यातून 2-3  वेळेस केस स्वच्छ धुणं गरजेचे आहे. 

Read More