Marathi News> हेल्थ
Advertisement

Omicron Variantची ही तीन प्रमुख लक्षणं!

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवा स्ट्रेन जगातील इतर देशांमध्ये वेगाने पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Omicron Variantची ही तीन प्रमुख लक्षणं!

मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटची दोन प्रकरणं कर्नाटकमध्ये नोंदवण्यात आली आहेत. यामुळे देशभरात चिंतेत भर पडली आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रोन प्रकार कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवा स्ट्रेन जगातील इतर देशांमध्ये वेगाने पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

संशोधनानंतर, कोविड-19च्या ओमिक्रॉन या नव्या प्रकारातील लक्षणं आणि इतर गोष्टींबाबत परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या एका डॉक्टरने ओमायक्रोनची लक्षणं आणि लसीच्या परिणामांविषयी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अँजेलिक कोएत्झी म्हणाले की, अनेक देशांमध्ये संसर्गाच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसतेय. 

ओमायक्रोन व्हेरियंटची ही 3 प्रमुख वैशिष्ट्ये

डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ओमायक्रोन व्हेरिएंटची लक्षणे पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा वेगळी असू शकतात. ओमायक्रोनच्या मुख्य लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी या रुग्णांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. याशिवाय काही रुग्णांमध्ये अशक्तपणाच्या तक्रारीही आढळून आल्या आहेत. 

ते पुढे की, आतापर्यंत एकाही रुग्णाने वास कमी होणं, चव कमी होणं, नाक जाम होणं आणि जास्त ताप येणे अशा तक्रारी नोंदवल्या नाहीत.

नवीन व्हेरिएंटवर ही लस प्रभावी ठरेल का?

डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, आतापर्यंत असं दिसतंय की, कोरोना लसीचा ओमायक्रोन व्हेरिएंट परिणाम होईल, कारण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. 

अँजेलिक कोएत्झी यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्राथमिक आरोग्य सेवा स्तरावरील डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रोन व्हेरिएंट हलका आहे. परंतु रुग्णालय स्तरावर हे चित्र बदलू शकतं. सध्या सुरुवातीचे दिवस आहेत आणि बरेच लोक रुग्णालयात दाखल झालेले नाहीत.

Read More