Marathi News> हेल्थ
Advertisement

नियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक

 सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते. 

नियमित सायकल चालवणे आरोग्यास लाभदायक

मुंबई : लहानपणी प्रत्येक जण सायकल चालवतो. लहानपणी सायकलची क्रेझ मुलांसोबत मुलींना देखील असते. पण मोठं झाल्यावर सायकलचा क्रेझ कमी होतो. बालपण सरल्यावर प्रत्येकाला इंधनावर चालणाऱ्या वाहनांची अपेक्षा असते. पण सायकल चावणं आरोग्यासाठी फार लाभदायक असतो. सायकल चालवण्याने मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारते. त्यामुळे आजार दूर राहतात. सायकल चालवण्याने काय फायदे होतात वाचा

- नियमित सायकल चालवणे हा 'एरोबिक' प्रकार आहे. ज्यामुळे शरीरावर जास्त ताण पडत नाही. 

- वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून ३ दिवस सायकल चालवा. रोज किमान अर्धा तास चालवण्याने आरोग्यास फायदा होतो. 

- जे लोक रोज अर्धा तास सायकल चालवतात त्यांना मधुमेह प्रकार-२ होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी कमी होतो.

- सायकल चालवण्याणे मन उदास होणे, ताण तणाव, चिडचचिडेपणा कमी होण्यास मदत होतो.

-  नियमित सायकल चालवण्याणे रक्त प्रवाह सुधारतो, ह्रदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते

 

Read More