Marathi News> हेल्थ
Advertisement

तुमच्या शरीरात व्हिटॅमीन बी 12 ची कमी आहे? या उपायांनी दूर करू शकता

मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 उपयुक्त आहे.

तुमच्या शरीरात व्हिटॅमीन बी 12 ची कमी आहे? या उपायांनी दूर करू शकता

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीरात अनेक जीवनसत्त्वं आणि पोषक तत्वांचा अभाव निर्माण होतो. निरोगी शरीरासाठी बर्‍याच प्रकारचे जीवनसत्त्वे आवश्यक असतात. त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12. व्हिटॅमिन बी 12साठी  इतर कोणताही पौष्टीक पर्याय असू शकत नाही. 

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, शरीरात चयापचय ते डीएनए सिंथेसिस आणि लाल रक्तपेशीसाठीही व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 उपयुक्त आहे. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास बर्‍याच गंभीर आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत आपल्याला शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यांच्या लक्षणांबद्दल आपल्याला माहित असली पाहिजे.

व्हिटॅमीन बी 12च्या कमतरतेची लक्षणं

  • त्वचा पिवळसर पडणं
  • जीभ लाल होणं
  • अंधुक दिसणं
  • तोंड येणं
  • स्मृती भ्रंश
  • डिमेंशिया
  • अशक्तपणा
  • डिप्रेशन

विटिलीगो (कोड-त्वचारोग)

डॉक्टर रंजना सिंह यांच्या सांगण्यानुसार, विटीलीगो ही एक त्वचेसंदर्भातील तक्रार आहे. यामध्ये शरीरात मेलेनिनची कमतरता निर्माण झाल्याने शरीरावर पांढरे डाग येतात. याचा परिणाम चेहरा, हात, पाय आणि मानेवर होऊ शकतो.

एंगुलर चेलाइटीस

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे ही तक्रार उद्भवते. यामध्ये तोंडाच्या कोपऱ्यावर लालसरपणा येतो तसंच सूज येते. 

हाइपरपिग्मेंटेशन

हायपरपिग्मेंटेशनमध्ये, डाग, ठिपके किंवा त्वचेचा रंग त्वचेवर गडद होतो. हे गडद ठिपके आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर उठू शकतात. असं तेव्हा होतं जेव्हा त्वचेत जास्त प्रमाणात मेलेनिन पिंग्मेंट तयार करण्यास सुरवात होते.

व्हिटॅमिन बी 12 ची जास्त कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिटॅमिन बी 12 पूरक आहारातूनही मिळू शकतं. यासाठी तुम्ही मासे, अंडी, मांस यांच्यामधून व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करू शकता. याचप्रमाणे दूध, दही, पनीर किंवा चीज देखील खाऊ शकता.

Read More