Marathi News> हेल्थ
Advertisement

Depression पूर्वी दिसून येतात अशी लक्षणं, जाणीवपूर्वक लक्ष द्या!

बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढलेला व्याप यामुळे अनेकजण ताणतणावाला बळी जातात.

Depression पूर्वी दिसून येतात अशी लक्षणं, जाणीवपूर्वक लक्ष द्या!

मुंबई : बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढलेला व्याप यामुळे अनेकजण ताणतणावाला बळी जातात. दररोजच्या ताणतणावाचं रूपांतर हे कालांतराने डिप्रेशन म्हणजेच नैराश्यात होतं. मात्र फक्त ताणतणाव, चिडचिडेपणा यामुळेच ही डिप्रेशनची लक्षणं नसतात. तर काही समस्यांमुळे देखील डिप्रेशन येण्याचा धोका असतो.

डायलॉग इन क्लिनिकल न्यूरोसायन्सेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार,  डॉक्टरांकडे येणाऱ्या ६९ टक्के डिप्रेशनग्रस्त लोकांमध्ये दुखीची लक्षणं जाणवतात. यामध्ये मूड डिसटर्डर, मायग्रेन, पचनासंबंधीच्या समस्यांचा समावेश आहे.

डिप्रेशनपूर्वी आढळून येणारी शारीरिक लक्षणं

मायग्रेन

नूरोलॉजीस्ट डॉ. के मॅनिक्स यांच्या सांगण्यानुसार, ज्या व्यक्तींना डिप्रेशनचा त्रास असतो त्यापैकी ४० टक्के व्यक्तींना डिप्रेशनचा त्रास जाणवतो. शिवाय मायग्रेनमुळे स्ट्रोक आणि चिडचिडेपणाची समस्या होत असल्याचं समोर आलंय. २००९ साली मॅनिटोबा विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, मायग्रेनने ग्रस्त असलेल्या ११ टक्के व्यक्तींना मूड डिसॉर्डर आणि मोठ्या प्रमाणात डिप्रेशनची समस्या जाणवली होती.

सांधेदुखी

अनेक अभ्यासांनुसार ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जाणवतो त्यांना ३.४ पटीने डिप्रेशनचा धोका असतो. जिना चढणं, खाली वाकणं यामुळे जाणवणार्या सांधेदुखीमुळे डिप्रेशनचा धोका असतो. सांध्याना सूज येणं, सांधेदुखीमुळे अवयव हलवता न येणं या ताणतणावामुळे डिप्रेशन येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

हृदयाचे आजार

अनेक अभ्यासांतून डिप्रेशन आणि हृदयाचे आजार यांच्यामध्ये संबंद असल्याचं आढळून आलंय. सरक्युलेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हृदयाच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये मध्यम आणि तीव्र प्रमाणात डिप्रेशन असतं. शिवाय या डिप्रेशनमुळे या रूग्णांना चार पटीने मृत्यूचा धोकाही अधिक असतो.

पाठीचं दुखणं

पाठदुखी ही आजकाल आपल्यापैकी अनेकांमध्ये दिसून येते. पाठदुखीच्या रूग्णांमध्ये चिडचिडेपणा आणि मूड डिसॉर्डर या डिप्रेशनला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आढळून येतात. लोअर बॅक पेन, पाठीचा मणका दुखणं या कारणांमुळे यामुळे व्यक्तींच्या दररोजच्या तणावात वाढ होते परिणामी नैराश्य येण्याचा धोका निर्माण होतो. यावर उपया म्हणून मसाज करून घ्यावा. जेणेकरून पाठीचं दुखणं आणि डिप्रेशन या दोन्ही समस्या थोड्या प्रमाणात कमी होतात.

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Read More