Marathi News> हेल्थ
Advertisement

सतत सर्दीचा त्रास होतोय? हे कारण असू शकतं...

संशोधकांनी यामागे नेहमी दुर्लक्ष केलं जाणारं हे कारण असू शकतं, असं सांगतिलं आहे.

सतत सर्दीचा त्रास होतोय? हे कारण असू शकतं...

नवी दिल्ली : अनेक लोकांना वारंवार सर्दी-तापाचा याचा त्रास होत असतो. काही जण याला हवामानातील बदलामुळे त्रास होत असल्याचं बोलून टाळतात आणि दुर्लक्ष करतात. अनेकदा यामागे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचंही बोललं जातं. परंतु, यामागे एक असंही कारण आहे, ज्याकडे आपण पाहत नाही.

सतत सर्दी-ताप येण्याचं कारण झोप पूर्ण न होणं हेदेखील असू शकतं. आपल्या झोपेच्या तासांकडे लक्ष ठेवा. जर झोप सहा तास किंवा त्याहून कमी होत असेल, तर हे सतत होणाऱ्या सर्दीचं प्रमुख कारण ठरु शकतं. 

एका अमेरिकी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, सहा तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या लोकांना याची समस्या लगेच होऊ शकते. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, कमी झोपेमुळे व्यक्तीला केवळ थकवाच जाणवत नाही तर, झोपेची कमतरता त्याला चिडचिडंदेखील करते. या व्यतिरिक्त व्यक्तीला अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतं.

जवळपास 150 लोकांवर झालेल्या या अभ्यासात असं समोर आलं की, सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांना लवकर सर्दीची समस्या होते. अभ्यासात सामिल झालेल्या सर्व लोकांच्या शरीरात हे परीक्षण करण्यात आलं. एका आठवड्यानंतर असं आढळलं की, जे लोक सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात, त्यांच्यात सात तासहून अधिकची पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत सर्दी होण्याची शक्यता 4.2 टक्के जास्त असते.

 

Read More