Marathi News> हेल्थ
Advertisement

'ही' 2 औषधं एकत्र घेणं धोकादायक, नसांमधील रक्त जाईल सुकून

  अनेकदा एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोळ्या घेणं शरीरासाठी घातक ठरु शकतं. शरीरातील पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी याची नक्की मदत होते. पण या दोन गोळ्या शरीरातील नसांमधील रक्त सुकवू शकते. 

'ही' 2 औषधं एकत्र घेणं धोकादायक, नसांमधील रक्त जाईल सुकून
Updated: Jun 29, 2024, 05:38 PM IST

How To Increase Iron:  अनेकदा एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोळ्या घेणं शरीरासाठी घातक ठरु शकतं. शरीरातील पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी याची नक्की मदत होते. पण या दोन गोळ्या शरीरातील नसांमधील रक्त सुकवू शकते. 

वयाच्या विशिष्ट वयानंतर शरीरातील पोषकतत्वे कमी होऊ लागतात. अशावेळी बाहेरुन औषधांची मदत घेणे आवश्यक पडते. अनेक औषधे आपली प्रकृती सुधारण्यासाठी घेतली जातात. पण या औषधांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असेल तर ती घेणे टाळली पाहिजेत. 

आपल्या शरीरात एकाचवेळी लोह आणि कॅल्शियमची औषधे घेणे धोक्याचे ठरु शकते. न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत यांनी सांगितल्यानुसार, या दोन पोषकतत्त्वांची औषधे एकत्र घेणे टाळले पाहिजेत. या औषधांचा परिणाम रक्ताच्या पातळीवर आणि त्याच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr.Priyanka Sehrawat (@docpriyankasehrawat)

डॉ. प्रियंका यांनी सांगितले की, लोहाच्या गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या एकत्र घेऊ नका. कारण कॅल्शियमच्या गोळ्या लोहाचे शोषण रोखतात. जर तुम्ही लोहाच्या गोळीमध्ये 100mg एलिमेंटल आयर्न घेत असाल तर त्यातील 70 ते 80 टक्के पचणार नाही आणि ते बाहेर टाकले जाईल.

जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल तर ते व्हिटॅमिन सी सोबत घ्या. तुम्ही लोहाच्या गोळ्यांसोबत व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेऊ शकता किंवा लिंबूवर्गीय फळांचे सेवन करू शकता. याशिवाय तुम्ही लिंबू पाणी किंवा संत्र्याच्या रसासोबत लोहाच्या गोळ्या घेऊ शकता.

रक्त सुकणे 

रक्ताचे कार्य पोषण शरीराला पोहोचवणे असे असते. त्यामुळे शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळते. ते तयार करण्यासाठी लोह आवश्यक आहे. जेव्हा शरीराला लोह मिळत नाही तेव्हा रक्त निर्मिती कमी होते. यामुळे ॲनिमिया होऊन अनेक समस्या निर्माण होतात.

शरीरात दिसणारी लक्षणे 

पिवळी त्वचा 
थकवा 
श्वास घेताना त्रास होणे 
अचानक वजन कमी होणे 
धड धड वाढणे 
डोकेदुखी 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)