Marathi News> हेल्थ
Advertisement

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

मुंबई : शरीरात केसांची विशेष भूमिका असते. ते शरीराच्या बहुतेक भागांवर असतात. आपल्या शरीरावर सर्वात जास्त केस असतात ते आपल्या डोक्यावर. तसे पाहाता आपल्या डोक्यावरील केस हे आपल्या सुंदरतेचं प्रतिक आहे. परंतु याव्यतिरिक्त आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर देखील केस असतात. परंतु तुम्ही कधी असा प्रश्न पडला आहे का, की आपल्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवर केस का नसतात?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात. परंतु माणसांच्या हाताच्या तळव्यांवर किंवा पायाच्या तळव्यांवर ते नसतात.

सायन्स अलर्टच्या संशोधनातून समोर आले आहे की हात आणि तळवे यांच्यावर केस न येण्यामागे एक खास कारण आहे, ते म्हणजे प्रोटीन. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, शरीरात एक विशेष प्रकारची प्रथिने आहे ज्याचा संबंध याच्याशी आहे.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, शरीरातील केसांच्या वाढीसाठी Wnt प्रोटीनचे संकेत आवश्यक असतात. ते दूतासारखा असतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की, शरीरात असे काही ब्लॉकर्स आहेत, जे Wnt प्रोटीनला त्याचे काम करण्यापासून रोखतात. हे ब्लॉकर देखील एक प्रकारचे प्रथिने आहेत. या प्रतिरोधकांना Dickkopf 2 (DKK2) म्हणतात.

उंदरांवर संशोधन करून हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संशोधनातून असे दिसून आले की, जेव्हा उंदरांच्या शरीरातून Dickkopf 2 प्रथिने काढून टाकण्यात आली, तेव्हा त्यांच्या शरीरावर केस नसलेल्या भागावर देखील केस वाढू लागले.

संशोधकांचे म्हणणे आहे की, काही प्राण्यांप्रमाणे माणसांच्या हातावर आणि पायावर केस वाढू लागले, तर त्यांना अनेक गोष्टी करण्यात अडचणी येतात. शास्त्रज्ञ म्हणतात, ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अजून संशोधन व्हायचे आहे.

Read More