Marathi News> हेल्थ
Advertisement

अॅसिडिटीकडे मुळीच दुर्लक्ष करु नका, जीवघेण्या आजाराचा करावा लागेल सामना

30 ते 40 वयोगटातील लोक या कॅन्सरला बळी ठरतायत

अॅसिडिटीकडे मुळीच दुर्लक्ष करु नका, जीवघेण्या आजाराचा करावा लागेल सामना

रिकाम्या पोटी राहणाऱ्या महिलांना अॅसिडिटीमुळे (acidity) पोटाचा कर्करोग (gastric cancer) होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर महिन्याला 50 ते 60 पोटाच्या कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मुझफ्फरपूर (SKMCH) येथे असलेल्या होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत आहेत. याला रुग्णालयाच्या सहायक अधीक्षक डॉ.तुलिका यांनी दुजोरा दिला. जुलै ते सप्टेंबरपर्यंत 226 पोटाच्या कॅन्सरचे (gastric cancer) रुग्ण कॅन्सर (cancer) हॉस्पिटलमध्ये आले आहेत, त्यापैकी 116 महिला आहेत. (Risk of Gastric Cancer increases in who starve for long time)

कर्करोग रुग्णालयाचे प्रभारी डॉ. रविकांत सिंह यांनी सांगितले की, पोटाच्या कॅन्सरच्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केले जात आहे. अनेक रुग्णांवर केमोथेरपीही (chemotherapy) सुरू आहे. दीर्घकाळ अॅसिडिटीमुळे पोटात कॅन्सर (cancer) होत असल्याचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.

30 ते 40 वयोगटातील ठरतायत बळी

होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ.शंतनू पवार यांनी सांगितले की, 30 ते 40 वयोगटातील लोक गॅस्ट्रिक कॅन्सरचे (gastric cancer) बळी ठरत आहेत. याचे कारण  त्यांची जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमधील (eating habits) अनियमितता आहे. महिला घरातील कामात बराच वेळ रिकाम्या पोटी राहतात, त्यामुळे त्यांच्या पोटात आम्लपित्त (Bile acid) तयार होते. त्यामुळे महिला या आजाराला बळी पडत आहेत.  जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत आम्ही पोटाच्या कर्करोगासाठी 10 शस्त्रक्रिया केल्या आहेत. अॅसिडिटीमुळे (acidity) होणाऱ्या कॅन्सरमुळे (cancer) दर महिन्याला सुमारे आठ रुग्ण रुग्णालयात येत आहेत.

अॅसिडिटीमुळे कर्करोग कसा होतो?

डॉ. शंतनू यांनी सांगितले की, पोटात दीर्घकाळ अॅसिडिटी निर्माण झाल्यामुळे एच पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग होतो. ते डीएनएसह जठराचे नुकसान करते. या संसर्गामुळे पोटात कर्करोग होतो. अॅसिडिटीमुळे पित्ताचे असंतुलन होते. अॅसिडिटीमुळे पोटातील पचनक्रियेचा समन्वय बिघडतो, त्यामुळे कॅन्सर तिथे वाढू लागतो. प्रदीर्घ आंबटपणामुळे पोटातील श्लेष्मा आणि डीएनए दुरुस्त होण्यास प्रतिबंध लागतो. पोटात अॅसिडीटी होत असेल तर रुग्णाने स्वत: डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे डॉ.पवार यांनी सांगितले. त्यासाठी एंडोस्कोपी केली जाते. एंडोस्कोपीमुळे ओटीपोटात संसर्ग दिसून येतो. त्यांनी सांगितले की पोटाच्या कॅन्सरच्या उपचारात बहुतेक रुग्ण केमोथेरपीने बरे होत आहेत.

कशामुळे होतो कर्करोग?

डॉक्टरांनी सांगितले की, केमिकलयुक्त अन्न हे पोटात आम्लपित्त तयार होण्याचे आणि नंतर कर्करोगात रुपांतर होण्याचे मोठे कारण आहे. आज बाजारात अनेक रासायनिक लोणचे मिळतात, ते खाल्ल्यानंतर पोटात अॅसिडीटी होऊ लागते. दारूपासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे.

Read More