Marathi News> हेल्थ
Advertisement

मानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या

'या' चार सोप्या टीप्सने तुम्हाला मानेवरचा मळ काढता येणार

मानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कडक उन्हामुळे आणि घाम येणे यामुळे त्वचा काळी पडू लागते. मानेभोवती देखील काळा मळ जमा होत असतो. मानेवरील काळेपणा संपूर्ण चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करतो. त्यामुळे चला जाणून घेऊया मानेवरील काळा मळ कसा काढला पाहिजे.  

'या' टीप्स वापरा

लिंबू आणि मध

एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस आणि तितकेच मध ही घ्या. या दोघांना मिक्स करून त्याचे पेस्ट बनवा. हे पेस्ट तुमच्या मानेच्या काळ्या भागावर लावा. या उपायाने मानेवरील काळे डाग दूर होतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.

दूध, हळद आणि बेसन

ही खास पेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी एक चमचा दूध आणि बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट मानेच्या काळ्या भागावर लावा आणि कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. आता मानेला चोळताना स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस असे केल्यावर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.

लिंबू आणि बेसन
एका वाटीत लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेच्या काळया भागावर लावा आणि काही वेळ कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. यानंतर मानेला घासून पाण्याने स्वच्छ करा.

दही आणि कच्ची पपई
प्रथम कच्ची पपई चांगली बारीक करून घ्या, त्यानंतर त्यात दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. यानंतर, पेस्ट मानेच्या काळ्या भागावर घासा आणि कोरडे होण्याची वाट पाहा. नंतर धुवा. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More