Marathi News> हेल्थ
Advertisement

फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या '4' फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !

उन्हाळा आला की सार्‍यांनाच आंबा, फणस, करवंदांची चाहूल लागते. अनेकजण उन्हाळ्यात हमखास आंब्याचा आस्वाद घेतात, परंतू फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया (आठळ्या) अनेकजण फेकून देतात. फणसाइतक्याच आठळ्यादेखील पोषकघटकांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच यंदा फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया फेकून देण्याऐवजी आहारात त्याचा समावेश करा. 

फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या '4' फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !
Updated: Apr 05, 2018, 08:25 AM IST

मुंंबई : उन्हाळा आला की सार्‍यांनाच आंबा, फणस, करवंदांची चाहूल लागते. अनेकजण उन्हाळ्यात हमखास आंब्याचा आस्वाद घेतात, परंतू फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया (आठळ्या) अनेकजण फेकून देतात. फणसाइतक्याच आठळ्यादेखील पोषकघटकांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच यंदा फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया फेकून देण्याऐवजी आहारात त्याचा समावेश करा. 

 मुबलक स्टार्च - 

 फणसांच्या बीयांमध्ये स्टार्च मुबलक प्रमाणात असतात. त्यातून शरीराला उर्जा मिळते. मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणजे वाटीभर वाफवलेल्या फणसाच्या बीया. वाफवलेल्या फणसाच्या बीया खाणं हा पोटभरीचा आणि हेल्दी नाश्त्याचा पर्याय आहे. 

फायबर घटक - 

फणसाच्या बीयांमध्ये कॅलरीज कमी आणि डाएटरी फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच जर तुम्ही वजन घटवण्यासाठी परयत्न करत असाल तर वाफवलेल्या फणसाच्या बीया हा उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. रक्तातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी राखण्यास, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते.

मुबलक मिनरल्स घटक - 

फणसाच्या बीयांमध्ये  मॅग्नीज, मॅग्नेशियम मुबलक असते. यामुळे हाडं मजबूत होतात. नर्व्ह्स सिस्टीमचं कार्य सुधारते. रक्ताचं क्लॉटिग होण्याच्या क्रियेला सकारात्मक चालना मिळते. शरीरातील टिश्यूंच्या कार्याला चालना मिळते. 

फायटोन्युट्रीएट्सचा पुरवठा - 

फणसाच्या बीयांमध्ये फायटोन्युट्रीएंट्स मुबलक असतात. यामुळे अकाली एजिंग होण्याची समस्या, रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो. फणसाच्या बीयांमधील अ‍ॅन्टी ऑक्सिडेटीव्ह घटक शरीराला फायदेशीर ठरतात. 

आहारात फणसाच्या बीयांचा कसा कराल वापर ?  

फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यामधील बीया बाजूला काढून स्वच्छ धुवा. फणसाच्या बीयांवरील चिकट स्तर काढून टाकल्यानंतर पाण्यात मीठ टाकून फणसाच्या बीया वाफवून घ्या.
बीया वाफवलेल्यानंतर टणक झालेलं आवरण काढून टाका आणि आतील गर खा. 

टरफलं काढलेल्या फणसाच्या बीया भाजीमध्ये, आमटीमध्ये, शाकाहारी, मांसाहारी रस्स्यामध्ये मिसळू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हांला नेहमी खाणार्‍या भाज्यांना नवा ट्विस्ट मिळणार आहे.