Marathi News> हेल्थ
Advertisement

... म्हणून मुली डेटवर यायला सह्ज तयार होत नाहीत

रिलेशनशीपचा काळ हा आयुष्यातील अत्यंत सुंदर काळापैकी एक आहे. 

... म्हणून  मुली डेटवर यायला सह्ज  तयार होत नाहीत

मुंबई : रिलेशनशीपचा काळ हा आयुष्यातील अत्यंत सुंदर काळापैकी एक आहे. या काळात तुम्हांला मिळणारी साथीदाराची साथ आयुष्याचा टर्निंग पॉईट ठरू शकतो. काहीजणांना कामाच्या ठिकाणी, मित्र मैत्रिणींच्या ओळखीत त्यांच्या साथीदाराची भेट होते. तर काही जण ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून त्यांच्या साथीदाराची निवड करतात. पण मुली सह्ज डेटवर येत नाहीत. ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा

डेटवर यायला मुली का तयार होत नाहीत ? 

भीती -

ऑनलाईन डेटिंगवर ओळख झाल्यानंतर मुली एकट्याने अनोळखी मुलाला भेटणं  टाळतात. त्यांना पुरेसा विश्वास बसल्यानंतर, मित्र मंडळींमध्ये काही ओळख निघतेय का? हे तपासून, त्याची चौकशी करून खातरजमा करूनच मुली बाहेर पडतात. मुलींच्या मनातलं ओळखायला मदत करतील 'या' टीप्स

विचलित होणं - 

जेव्हा आयुष्यात खास व्यक्ती येते, प्रेमप्रकरणं जुळून साथीदाराची निवड करण्याची वेळ येते नेमका तोच काळ अनेकांच्या आयुष्यात अभ्यासाच्या दृष्टीने, करियरच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यामुळे लक्ष विचलित होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुली अनोळखी मुलांच्या फंद्यात पडत नाहीत. रोमॅन्टिक नात्याला सुरूवात करण्यापूर्वी विचारा हे '10' प्रश्न 

विश्वास - 

मुली पटकन कोणत्याही मुलावर विश्वास ठेवत नाहीत. भविष्यात ज्या गोष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी टाळणंच त्या पसंत करतात. ...म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!

Read More